प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने बालक्रीडा स्पर्धेचे आयोजन

प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने बालक्रीडा स्पर्धेचे आयोजन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 10/11/2025 :
कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शंकरनगर येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने रविवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी बालक्रीडा स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी दिली.

मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप क्रीडा मंडळाने राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा, आट्यापाट्या स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, भव्य कुस्ती स्पर्धा, तर गरजूंना दिवाळीचा सण साजरा करता यावा याकरिता रत्नाई मिठाई वाटप असे विवीध उपक्रम राबवले आहेत.
याच पद्धतीने रविवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे बालक्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत बालगटापासून इयत्ता चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.
यामध्ये लहान गटासाठी डोक्यावर चेंडू घेऊन पळणे ४० मी, मोठ्या गटासाठी धावणे ६० मी, इयत्ता पहिलीसाठी कमरेवर हात ठेवून उड्या मारत जाणे ४० मी, इयत्ता दुसरी साठी लंगडी घालत जाणे ४० मी, इयत्ता तिसरी साठी तीन पायाची शर्यत ४० मी, व इयत्ता चौथीसाठी पोत्यात पाय घालून उड्या मारत जाणे ४० मी अशा क्रीडा प्रकाराचा समावेश आहे.
या स्पर्धेतील प्रत्येक गटासाठी स्वतंत्र अशी बक्षीस ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेसाठी सहा मैदाने व ४५ पंच काम पाहणार आहेत.
स्पर्धेतील नावनोंदणी करिता रमेश गायकवाड ९८६०८७६५३५, प्रशांत जगताप ९६३७१७४१६७, हनुमंत किर्दक ९६७३०३०३१८, प्रकाश मगर ८७६७२४५४५३, युवराज बनपट्टे ९८३४७५५९१२, व अभिजीत कुरळे ९८५०५८४०८७ यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील यांनी केले आहे. यावेळी सचिव बिभीषण जाधव, स्पर्धाप्रमुख शिवाजी पारसे, भानुदास आसबे, संजय राऊत, अर्जुन बनसोडे सर्व सदस्य, सर्व क्रीडा प्रशिक्षक उपस्थित होते.

