‘सहकार महर्षिं’च्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठाशी संलग्नित आंतर विभागीय क्रीडा स्पर्धा मध्ये घवघवीत यश

‘सहकार महर्षिं’च्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठाशी संलग्नित आंतर विभागीय क्रीडा स्पर्धा मध्ये घवघवीत यश
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 10/11/2025 :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशाख विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत आंतर विभागीय क्रीडा स्पर्धा दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी ऑर्किड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, सोलापूर येथे पार पडल्या या स्पर्धेत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर- अकलूज येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . प्रवीण ढवळे यांनी दिली.
सदरच्या स्पर्धामध्ये वेट लिफ्टिंग, पावर लिफ्टिंग व रेसलिंग जुडो अशा विविध स्पर्धा विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या संस्थेमध्ये पार पडल्या. स्पर्धेत बि.टेक. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील रुद्रतेज माने देशमुख याने वेटलिफ्टिंग व पावर लिफ्टिंग आणि ज्युदोमध्ये आंतर विभागीय स्तरावर या तिन्ही क्रीडा प्रकारात १०५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. (त्याची तिन्ही क्रीडा स्पर्धांमध्ये अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावर निवड झाली आहे)
द्वितीय वर्ष मेकॅनिकल इंजीनियरिंग विभागातील प्रथमेश तानाजी माने देशमुख वेटलिफ्टिंग आणि ज्युदोमध्ये आंतर विभागीय स्तरावर या दोन्ही क्रीडा प्रकारात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. (त्याची वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धांमध्ये अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावर निवड झाली आहे)
चतुर्थ वर्ष कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागातील विश्वराज अलगुडे याने पावर लिफ्टिंग या क्रीडा प्रकारांत ६६ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच यशराज रणवरे यांनी वेटलिफ्टिंगमध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे.
एअर रायफल टेन मिटर मध्ये तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल विभागातील प्रेरणा धनाजी राऊत हिने आंतर विभागीय स्पर्धे मध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे.
विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, संस्थेचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले सदरच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून क्रिडा शिक्षक प्रा. विकास शिवशरण यांनी काम पाहिले.

