आमची उमेदवारीची मागणी

आमची उमेदवारीची मागणी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 11/11/2025 :
अकलूज नगरपरिषदेची पहिली निवडणूक ही केवळ राजकारणाची वेळ नाही, तर अकलूजच्या प्रत्येक घर, प्रत्येक समाज, प्रत्येक मातीच्या कणासाठी काम करण्याची संधी आहे. मी लालासाहेब अडगळे आणि माझी जीवनसाथी सौ. रेश्मा अडगळे, अकलूजचा सर्वांगीण विकासाचा झालेलाच आहे त्यात आम्ही खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करणार आहोत.
समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन आदर्श अकलुजची साथ देणार आहोत.
आमचा हेतू केवळ पद मिळविण्याचा नाही, सामान्य माणसालाही मोहिते पाटील परिवार किती उंचीवर घेवून जातो हे सांगण्याचा आहे.
आज आम्ही दोघेही उमेदवारी मागताना एकच अपेक्षा बाळगतो
अकलूजचे शिल्पकार मोहिते पाटील परिवार आणि या भूमीवरील प्रत्येक नागरिक यांचा आशीर्वाद आमच्यावर राहो.
आप़ले कृपाभिलाषी
श्री. लालासाहेब ज्ञानोबा अडगळे
सौ. रेश्मा लालासाहेब अडगळे

