ताज्या घडामोडी

मोहिते-पाटील परिवाराच्या कार्याला सदैव साथ देणारे अकलूजचे गायकवाड कुटुंबाची तिसरी पिढी

मोहिते-पाटील परिवाराच्या कार्याला सदैव साथ देणारे अकलूजचे गायकवाड कुटुंबाची तिसरी पिढी

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 10/11/2025 :
मोहिते-पाटील परिवाराने दिलेल्या संधी सोने करणारी अकलूजमधील गायकवाड कुटुंब आहे.गेली तीन तिढ्या मोहिते-पाटील यांच्या सामाजिक कार्याला इमानदारीने व ऐतबारीने साथ दिली आहे. गायकवाड कुटुंबाची सामाजिक कार्याची सुरवात कर्मवीर बाबासाहेब माने-पाटील,सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील व माजी आमदार चांगोजीराव आबासाहेब देशमुख यांनी अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत बाबुराव बापू गायकवाड यांना अकलूज ग्रामपंचायतीचे सदस्य करून सामाजिक कार्य करण्याची संधी दिली होती.त्यांच्या पश्चात त्यांची नातसून सौ.प्रतिभा विलासनंद गायकवाड यांना महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व जयसिंह मोहिते- पाटील यांनी अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सदस्यपदी बिनविरोध निवड केली होती.तेथून सौ.प्रतिभा गायकवाड यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली.त्यांना अकलूज ग्रामपंचायतीचे जेष्ठ सदस्य जयसिंह मोहिते-पाटील व उपसरपंच संग्रामसिंह मोहिते- पाटील यांनी त्यांच्या सामाजिक कार्याला मार्गदर्शन केले.आज बघता बघता अनेक उल्लेखनीय कार्य करून मिळालेल्या संधीचे त्यांनी सोनेच केले आहे.


सौ.प्रतिभा गायकवाड शिक्षण आर्ट्स शाखेतून गॅज्युएशन झाले असून त्यांच्या सामाजिक कार्याची सुरवात सन २०१० ते २०१५ या काळात अकलूज ग्रामपंचायतीच्या सदस्या राहिल्या आहेत.त्याकाळात अकलूज ग्रामपंचायतीचे उपसरपंच संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शन विविध सामाजिक कार्य केले आहे.अकलूजच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या समितीवर सदस्या म्हणून राहिल्या होत्या.अकलूज पोलीस स्टेशनच्या दक्षता कमिटीवर सदस्य म्हणून कार्य केले आहे. त्यानंतर विजयदादांच्या मार्गदर्शनखाली २०१३ ते २०१७ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकलूज शहर महिला अध्यक्षपद भूषवले होते.पक्ष वाढीसाठी भरपूर प्रयत्न केले.पुढे सन २०१६ साली लोकायत लोकसंचलित साधन केंद्राच्या महिला बचत गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली.तेव्हापासून आजपर्यंत ते पद संभाळत आहे.या लोक संचलित साधन केंद्राच्या माध्यमातून ४०९ बचत गट स्थापन करून ४०९५ महिला या बचत गटाच्या सदस्या आहेत.दरवर्षी सर्व बचत गटांना १० कोटीचे कर्ज वाटप केले जाते.यामुळे बचत गटातील महिलांना आर्थिक कर्ज उपलब्ध होत असल्यामुळे महिला छोटे-मोठे व्यवसाय करून महिला स्वावलंबी झाल्या आहेत.त्याच बरोबर महिलांसाठी आरोग्य शिबीर,एच बी कॅप,हेल्थ कॅप,विविध क्रिडा स्पर्धा असे अनेक उपक्रम बचत गटातील महिलांसाठी आयोजित केले आहेत. बचट गटाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सुषमा स्वराज स्मृती राष्ट्रीय पुरस्काराने सौ.प्रतिभा गायकवाड यांना सन्मानित केले होते.
“मी फळवणी सारख्या छोट्या गावातून अकलूजला सून म्हणून आली.आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचे सदस्य होण्याची संधी विजयदादा व बाळदादांनी दिली.त्यामुळे मला चांगले सामाजिक कार्य करण्याची संधी मिळाली होती.त्याचे मी सोने केले आहे.आता नगरपरिषदेच्या निवडणुकीत मला नगराध्यक्ष होण्याची संधी दिली तर मोहिते-पाटील परिवाराच्या मार्गदर्शनाखाली अकलूजचा विकास करण्याचा माझा मानस आहे.

सौ.प्रतिभा विलासानंद गायकवाड
अकलूज ग्रामपंचायत माजी सदस्य

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button