वनविभागाकडुन मेंढपाळास मिळाली २६ हजार रुपये नुकसान भरपाई.

वनविभागाकडुन मेंढपाळास मिळाली २६ हजार रुपये नुकसान भरपाई.
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 10/11/2025 : वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या बकऱ्यांच्या भरपाई पोटी मेंढपाळ बिरू भीमराव अनुसे( रा. बु. वठार ता. हातकणंगले) यांना वनविभागाकडुन २६ हजार रुपये नुकसान भरपाई पोटी देण्यात आले. नुकसान भरपाई मिळावी यासाठी यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून संजय वाघमोडे यांनी पाठपुरावा केला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि मेंढपाळ बिरू अनुसे हे आपल्या मेंढ्या चारणीसाठी बागणी ता. वाळवा येथील बागणी येथील शेतकरी रवी गावडे यांच्या शेतात खतासाठी मेंढ्या बसविल्या असताना वन्यप्राण्यांनी ३०/५/२०२५ रोजी हल्ला करून ५ बकऱ्यांना ठार मारले होते.
नुकसान भरपाई मिळणेसाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, भिवा कोळेकर वनरक्षक बावची, निवास उघळे विक्रम टेंबे विजय मदने वन सेवक, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर केंद्रे यांचे सहकार्य मिळाले. नुकसान भरपाई मिळाल्यानंतर बु. वठार येथे मेंढपाळांच्या वतीने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

