नगरपरिषद निवडणुकी संदर्भात अकलूज येथे काँग्रेसची बैठक संपन्न
🔵 नगरपरिषद निवडणुकी संदर्भात अकलूज येथे काँग्रेसची बैठक संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 12/11/2025 :
नव्याने झालेल्या अकलूज नगरपरिषदेच्या निवडणूकी संदर्भात चर्चा विचारविनिमय करण्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खा.प्रणितीताई शिंदे, सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी मोहन जोशी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सातलिंग शटगार यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज नगरपरिषद निवडणुकी संदर्भात अकलूज येथे काँग्रेसची बैठक संपन्न झाली.
या बैठकी मध्ये निवडणूक संदर्भात चर्चा झाली.नगरपरिषद निवडणूकीत आघाडी झाली तर ठीक नाही तर स्वबळावर निवडणुका लढण्याचे बैठकीत ठरले.
🔸यावेळी प्रभारी मोतीराम चव्हाण म्हणाले अकलूज नगर परिषद निवडणुकीत योग्य नियोजन करून निवडणूक लढवण्यास काँग्रेस पक्षाचे उमेदवार निश्चितपणे निवडून येतील.
🔸प्रभारी सिद्राम पवार आपल्या मार्गदर्शनात म्हणाले भाजप सरकारने महागाई वाढवली बेरोजगारी वाढवली महिला वरील अत्याचार वाढले आहेत. जनतेला आता बदल हवा आहे. आपण सर्वांनी मिळून लोकांच्या घरोघरी जाऊन काँग्रेस पक्षाने केलेली विकासाची कामे लोकांना पटवून सांगू.
🔸तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे म्हणाले. अकलूज निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून चांगले नियोजन करून जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील असे काम करून निवडणुकी पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील यासाठी प्रयत्न करू.
भटक्या विमुक्त जाती विभागाचे
🔸 विमुक्त जाती भटक्या जमाती विभागाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण नारायण भोसले म्हणाले काँग्रेस पक्ष हा विचाराचा पक्ष असून सर्व धर्मांना घेऊन जाणारा पक्ष आहे. सध्या काँग्रेस पक्षाची गरज असून या निवडणुकीमध्ये लोक काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून देतील.
याप्रसंगी जिल्हा खजिनदार सुरेश आप्पा शिवपूजे, प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे चिटणीस भीमराव रामा बंडगर, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब आप्पासाहेब मगर, राजाभाऊ मारुती गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या बैठक प्रसंगी संतोष पांडुरंग कांबळे, सुभाष सरतापे, हनुमंत साठे, अशोक मारुती पांढरे, संभाजी गोविंद साठे, विशाल नवनाथ जगताप, ॲड. नागेश रघुनाथ काकडे, निलेश जालिंदर पगारे, शिवानी निलेश कांबळे, भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे इत्यादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

