मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 07/11/2025 :
“साधेपणा” हा आपल्या वैयक्तिक राहणीमानात हवा तसा सार्वजनिक ठिकाणी पण हवा. “साधी राहणी, उच्च विचारसरणी” असे आपण फक्त म्हणतो पण वागताना मात्र विरुद्ध वागतो.
भपकेबाजपणा करण्याची आपली सवय जात नाही. केळवण,बारसे, ओटीभरण असो किंवा सत्यनारायण पूजा यासारखे घरगुती कार्यक्रम असो, ध्वनी प्रदूषणाचा विचार न करता, कार्यक्रमाच्या दृष्टीने न शोभणारी गाणी लावून आनंद साजरा केला जातो. नको तो अनावश्यक खर्च केला जातो.
यासाठी प्रत्येकाने शांत मनाने विचार केला पाहिजे. पैशाची अशी वारेमाप उधळपट्टी करण्याऐवजी योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात खर्च करावा. त्या कार्यक्रमाचे पावित्र्य जपावे, मनापासून विधी करावेत. संयमाने वागावे, आत्मभान ठेवावे.
आजचा संकल्प
आपल्या श्रीमंतीचे ओंगळवाणे प्रदर्शन करण्याऐवजी जवळ असलेल्या संपत्तीचा सदुपयोग करू. जिथे गरज तिथे तिचा उपयोग करू व हा पैशाचा गैरुपयोग थांबवू._
सौ. स्नेहलता स. जगताप.
=====================

