ताज्या घडामोडी
विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 07/11/2025 :
आपल्याला नेहमीच आनंदी वातावरण आवडते. वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी व्हायला आवडते. समोरच्या व्यक्तींचे आनंदी चेहरे पाहायला आवडते. साहजिकच अशा वातावरणात आपण पण आनंदी होतो.
मात्र आपण आनंद साजरा करत असताना जर काही लोक दुखी असतील तर त्यांचे दुःख पण आपण समजून घेतले पाहिजे. दुसऱ्याच्या वेदना समजून घेण्याइतकी संवेदनक्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे.
मुलांनो, कोणाला ज्या प्रकारची अडचण आहे किंवा त्यांचे जे दुःख आहे त्यामध्ये आपण त्यांच्या बरोबर राहिले पाहिजे. त्यांच्या कुटुंबियांना आम्ही तुमच्या बरोबर आहोत असा आधार दिला पाहिजे. त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
सुखात तर सगळेच सोबती असतात पण दुःखात साथ देणे जास्त महत्वाचे.
सौ. स्नेहलता स. जगताप

