निमगावात शिवप्रसाद फाउंडेशन व सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर व मोफत चष्मे वाटप

निमगावात शिवप्रसाद फाउंडेशन व सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर व मोफत चष्मे वाटप
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 27/10/2025 :
माळशिरस तालुक्यातील निमगाव (मगराचे) येथे शिवप्रसाद फाउंडेशन व सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
दि. 27 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 2 पर्यंत मारुती मंदिर, निमगाव (मगराचे) ता.माळशिरस जि.सोलापूर इथे आयोजित केलेल्या शिबिराचे उद्घाटन शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद (बापु) मोरे व जि.प.माजी सदस्या सौ.ऋतुजा शरद मोरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्री महालक्ष्मी प्रतिमा पूजनाने झाले.
याप्रसंगी , डॉ.लता मोरे, सरपंच सुभाष साठे, उपसरपंच नंदकुमार पाटील, श्रीमंत मगर (जेष्ठ नेते), किरण पाटील (ग्रा.पं. सदस्य), काँग्रेसचे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब मगर (नेते), पत्रकार निनाद पाटील, विश्वनाथ (बापु) मगर, आप्पासाहेब जाधव (जि. प.मराठी शाळा माजी अध्यक्ष), विजय मगर, बाबासाहेब मगर, जगन्नाथ मगर, प्रताप मगर, हनुमंत मगर, जालिंदर मगर, दत्ता मगर, सौ. निता मगर, भिवाजी कुलाळ, सच्चीदानंद पिंगळे, पदाधिकारी, नागरिक, शिबिरार्थी, सेवासदन हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी, शिवप्रसाद फॉउंडेशनचे कर्मचारी उपस्थित होते

यावेळी निमगाव ग्रामस्थांच्या वतीने शरद (बापु) मोरे, सौ.ऋतुजा शरद मोरे यांचा सत्कार करण्यात आला.
शिबिरामध्ये 1) मोफत हृदयरोग तपासणी( ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी) 2) मोफत यूरोलॉजी तपासणी ( लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट) 3) मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप( तिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण, पापणी पडलेले-रेटीना)
4) मोफत कॅन्सर तपासणी 5) मोफत रक्त तपासणी 6) मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया 7) मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया 8) अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया
इत्यादी विविध आजारांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. शिबिराचा 510 नागरिकांनी लाभ घेतला. तसेच मोठ्या प्रमाणात मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
सेवासदन मल्टी स्पेशालिस्ट यांच्यातर्फे सौ.लता मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच ऑपरेशन साठीची तपासणी केली.

