माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी कार्यकारणी जाहीर

माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी कार्यकारणी जाहीर
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 25/10/2025 :
माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांनी माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकारी आणि सदस्यांच्या नावाची पहिली यादी शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष सातलिंग आ. शटगार यांच्याकडे सुपूर्द केली. याप्रसंगी भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे हे उपस्थित होते.
तालुका कार्यकारणी मध्ये ॲड. विठ्ठल तात्याबा पिसाळ उपाध्यक्ष, रमेश अंकुश नामदास उपाध्यक्ष, शशिकांत नारायण जाधव उपाध्यक्ष, प्रमोद प्रकाश राजमाने उपाध्यक्ष, संभाजी गोविंद साठे उपाध्यक्ष, रियाज रहमान काजी सरचिटणीस, धनाजी श्रीपती मस्के सरचिटणीस, संतोष पांडुरंग कांबळे सरचिटणीस, सुभाष सत्यवान सरतापे सरचिटणीस, तेजस सुरेश जाधव सरचिटणीस, नागेश बाळासाहेब सुळ सरचिटणीस,ॲड. शरफू मलिक शेख चिटणीस, ॲड. वैभव सुधाकर धाईंजे चिटणीस, उस्मान बाबू शेख सदस्य, पांडुरंग राणू गेजगे सदस्य, विशाल सुनील सोरटे सदस्य, भारत भीमराव मगर प्रसिद्धीप्रमुख, अजय जीवनदास सोरटे नातेपुते शहर अध्यक्ष. याप्रमाणे जणांची पहिली यादी जिल्हाध्यक्ष यांच्याकडे सु सुपूर्द करून यादीची एक प्रत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे.
“काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीने प्रभावित झालेल्या युवकवर्गांचा ओढा काँग्रेसकडे वाढत्या प्रमाणात असून तालुका कार्यकारणी मध्ये विविध पदांवर आणि समित्यांवर काम करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. इच्छुकांमधून निवड होणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नावे यथावकाश जाहीर करून तालुका कार्यकारणी चे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. असे याप्रसंगी तालुकाध्यक्ष गिरीश शेटे यांनी सांगितले.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात बोलवण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीमध्ये “आम्ही माळशिरस तालुक्यातील अकलूज नगरपरिषद, तालुका पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणूक सर्व जागा स्वबळावर (स्वतंत्र) लढविणार असल्याचे” लेखी पत्र तालुकाध्यक्ष गिरीश शेटे यांनी जिल्हाध्यक्षांकडे सादर केले. या तीनही निवडणुका मधील प्रभाग, गण आणि गट याबाबतचा सविस्तर अहवालही सादर केला.

