अकलूज वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने ॲड. अमित अनंतराव कारंडे आणि आणि गिरीष प्रभाकर शेटे यांचा सत्कार

अकलूज वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने ॲड. अमित अनंतराव कारंडे आणि आणि गिरीष प्रभाकर शेटे यांचा सत्कार
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 08/10/2025 : अकलूज वीरशैव लिंगायत समाजा च्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (काँग्रेस प्रांताध्यक्ष कार्यालयाशी संलग्न) प्रदेश सरचिटणीस ॲड. अमित अनंतराव कारंडे आणि काँग्रेसचे माळशिरस तालुका नूतन अध्यक्ष गिरीष प्रभाकर शेटे यांचा सत्कार केला. इत्यादी प्रमुख विषय चर्चेत होते. या सत्कार सोहळ्याप्रसंगी साप्ताहिक अकलूज वैभव आणि पाक्षिक वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे उपस्थित होते.
बुधवार दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी अकलूज येथील जागृत पुरातन महादेव मंदिरात संपन्न झालेल्या सत्कार सोहळ्या नंतर विविध विषयांवर चर्चा झाली त्यामध्ये पदवीधर मतदार संघ शिक्षक मतदार संघ मतदार यादी मध्ये नाव नोंदणी, तरुण नव उद्योग व्यवसायकां साठी विविध बँकांच्या माध्यमातून सुलभतेने अर्थसहाय्य, तालुक्यात गाव तेथे वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमी, इत्यादी महत्त्वपूर्ण विषयांवर विचार विनिमय करण्यात आला. याप्रसंगी अकलूज वीरशैव लिंगायत समाजाचे मान्यवर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.