ताज्या घडामोडी
कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांची ५८ वी पुण्यतिथी साजरी

कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांची ५८ वी पुण्यतिथी साजरी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 08/10/2025 : माळशिरस तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त विजय चौक अकलूज येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील याचे प्रमुख उपस्थितीमध्ये पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी किशोरसिंह माने पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, क्रांतिसिंह माने पाटील यांचे सह अकलूज मधील विविध संस्थेचे पदाधिकारी, आजी माजी सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.