ताज्या घडामोडी

लबाड लांडगा ढॉंग करतय | सहानुभूती दाखवयाचे सॉंग करतय ||

लबाड लांडगा ढॉंग करतय | सहानुभूती दाखवयाचे सॉंग  करतय ||

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क 
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई
दिनांक 30/09/2025 :
कधी नाही ते मराठवाडा ,सोलापूर बीड ,धाराशिव या अनेक शहरात, अनेक जिल्ह्यातून प्रचंड पाऊस झाला आहे शेतकरी व्यापारी व गोरगरीब नागरिक यांचे कधीही व कशानेही न भरून येणारी नुकसान झाले आहे.
सणावाराचे दिवस आहेत पुर परिस्थितीमुळे त्यांच्या घरी चूल पेटणे पण अशक्य झाले आहे हे सर्व आपण पाहतच आहात.
ॲस्प्रोने ने कॅन्सर बरा होतो.
माझे एक मित्र स्व. श्रीधर काळे या एका सदाचारी संघस्वसेवकाला अचानक कॅन्सरने ग्रासले त्यावेळी माझे दुसरी स्नेही लाखो रुपयांमध्ये खेळतात व इन्कम टॅक्स भरतात त्यांनी मला एकदा सांगितले मी श्रीधरला आर्थिक मदत केली आहे माझ्या मनात पाल चुकली मी मुद्दाम म्हणून काळेला भेटायला गेलो व त्या धनीक व्यापाऱ्याने तुला काय मदत केली काय असे विचारले तरी तो म्हणाला माझ्या देव्हाऱ्यात त्या धनीकाने 500 रुपये ठेवलेले आहेत ते मी माझ्या पत्नीला नदीवरच्या गणपतीच्या मदत पेटीत टाकण्यास सांगितले आहे.
ॲस्प्रोची गोळी कॅन्सरग्रस्ताला द्यायची आणी मदतीचे ढोंग करावयाचे.
कॅन्सर सारख्या दूर्धर आजारात.500₹ मदत करून आपला दानशूर पणा व मदत करण्याची प्रवृत्ती याची जाहिरात करणारा धनीक व महाराष्ट्रातील ढोंगी आप मतलबी व संधी साधू राजकारणी यांच्यात काही फरक नाही.
वाचक बंधू-भगिनींनो नक्कीच ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे त्या ठिकाणचे नागरिकांचे शेतकऱ्यांचे हाल कुत्रे पण खात नाही. अशावेळी त्यांना मदत करणे की मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणे, केंद्र सरकारकडे मदत मागणे व त्या चाय बिस्कीट पत्रकारांच्या कोंडाळ्यात बसून आपण पूर परिस्थितीवर काय केले यासाठी आपली पाठ थोपटून घेणे हे महाराष्ट्रातील राजकारण्यांनी सुरू केले आहे.
मोर्चे, मेळावे दौरे या वरील वाह्यात खर्च
अरे तुमची तुम्ही तुमच्या मोर्चाला, मेळाव्याला दौऱ्याला लाखो रुपये खर्च करता आणि जाहिरातीवर आणि चाय बिस्कुट पत्रकारांच्यावर पैसे उधळता तुम्हाला असे वाटत नाही का एक तालुका, एक गाव ,एक जिल्हा आपण आपल्या पक्षातर्फे दत्तक घ्यावा त्या लोकांना पक्षातर्फे आर्थिक मदत साहित्य पोहोचवावी पण असे करताना तळघरातील ,कंटेनरमधील किंवा साठवलेले पैसे खर्च होतील
त्यापेक्षा एक पत्र लिहायचे एक निवेदन द्यायचे धमकी द्यायची आणि आपली जबाबदारी झटकून टाकायची हे बंद करा.
दुसरे एक नेते आहेत त्यांनी फुले उधळून धेण्यामध्ये मोर्चे काढण्यामध्ये चार वर्षात अब्जावधी रुपये उडवलेले आहेत ते जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. या उलट सरकारने मदत नाही केल्यास महाराष्ट्र बंद करू अशा भीमगर्जना करत आहेत.
काळा पैसा बाहेर काढाआणि करा मदत तुमच्या शेतकरी बांधवांना आणि पूरग्रस्तांना पण ते तुम्हाला जमणार नाही कारण तुम्हाला फक्त घ्यायचे माहित आहे त्यामुळे पत्र लिहिणे, निवेदन करणे ,मदत मागणे, धमकी देणे एवढेच तुम्ही करू शकता.
जा आणी रा स्व संघाचे तुमच्या भाषेतील प्रतिगामी संघ सेवक काय मदत करतात ते उघडा डोळे आणि पहा नीट.
नाहीतर तुमची ही निवेदने ,पत्रे धमक्या हे सगळं लबाड लांडगा ढॉंग करतय सहानुभुती दाखवायचं सॉंग करतय असेच होणार आहे.

जरा नाईट क्लब, ऐय्याशी जीवन व परदेशगमन यावरील खर्च जरा पूरग्रस्ताकडे वळवा
नाहीतर ईव्हीएम च्या नावाने बोंबला

ॲड. अनिल रुईकर
98 232 55049
इचलकरंजी
####################

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button