“भारतीय संस्कृतीतील विविध सण-उत्सवांचा आपण आनंद घेतला पाहिजे” ;कु. इशिता धैर्यशील मोहिते पाटील

“भारतीय संस्कृतीतील विविध सण-उत्सवांचा आपण आनंद घेतला पाहिजे;” कु. इशिता धैर्यशील मोहिते पाटील
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 30/09/2025 :
भारतीय संस्कृतीतील सण-उत्सवांचा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे, असे मत कु. इशिता धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले. त्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई शाखा अकलूज आयोजित दांडिया रासगरबा प्रशिक्षण कार्यशाळा व स्पर्धा बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत होत्या.
ही कार्यशाळा दिनांक २३ ते २८ सप्टेंबर २०२५ दरम्यान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ. शितलदेवी मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. प्रशिक्षणाची जबाबदारी सोनम नारायणकर व्होरा यांनी पार पाडली.
समारोपप्रसंगी बोलताना कु. इशिता मोहिते पाटील म्हणाल्या, “आजच्या काळात समाजातील संवाद हरवू लागला असताना अशा कार्यशाळा लहान मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देतात.”
कार्यशाळा समाप्तीनंतर २९ सप्टेंबर रोजी स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये लहान गटात परिणीता वर्दम हिने प्रथम क्रमांक, स्वरा कुंभार हिला द्वितीय क्रमांक, देशना शहा हिला तृतीय क्रमांक मिळाला तर स्वामिनी भिसे हिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. खुल्या गटात उत्कृष्ट वेषभूषा पुरस्कार रुतूजा पराडे व डॉ. बीना आर्वे यांना देण्यात आला. श्रेया टेके हिने प्रथम, स्वस्तीका सावंत हिने द्वितीय तर दिपाली राऊत हिने तृतीय क्रमांक पटकावला.
या कार्यक्रमाच्या आयोजनात आशिकी चिंतामणी, हर्षंद घोंगडे, अक्षय लावंड, अमोल फुले तसेच नाट्यपरिषद शाखा अकलूजचे पदाधिकारी व सदस्य यांचा मोलाचा सहभाग होता. परीक्षक म्हणून मनोज वर्दम व रवि नागटिळक यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाला शिवदत्त नारायणकर, सुनील कांबळे, अमित पुंज, लाला मुजावर, राजू कोळी, दत्ता चौगुले, सनी वर्दम आदी मान्यवर उपस्थित होते.