फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज,भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी आणि श्री सन्मती सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने सम्मेद शिखरजी, मधुबन येथे स्वच्छता अभियानचे आयोजन

फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज,भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी आणि श्री सन्मती सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने सम्मेद शिखरजी, मधुबन येथे स्वच्छता अभियानचे आयोजन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 14/09/2025 : फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज,भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी आणि श्री सन्मती सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यासह इतर ३ राज्यातील १००८ जैन श्रावक जैन धर्मियांची काशी म्हणून ओळख असलेल्या श्री सम्मेद शिखरजी, मधुबन (झारखंड) येथे स्वच्छता अभियान राबविणार आहेत. त्यासाठी मुंबई, सोलापूरसह विविध जिल्ह्यातील २४० जैन श्रावक श्राविका दौड येथून दि.१२ रोजी रवाना झाले आहेत. यात सोलापूर जिल्ह्यातील पापरी, मोहोळ, पंढरपूर, अकलूज, नातेपुते, करमाळा आदि तालुक्यातील जैन धर्मीय सहभागी झाले आहेत.
सोलापूर, मुंबईसह पुणे, अहिल्यानगर,धाराशिव छ. संभाजीनगर,सातारा बीड जिल्ह्यातील जैन धर्मियांचे व तरुण तरुणींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्री सन्मती सेवा दलाकडून गत १३ वर्षांपासून श्री सम्मेद शिखरजीच्या उंच पहाडावर स्वच्छता अभियान राबविले जाते.यावेळेचे हे १४ वे वर्ष आहे. भारत वर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व सन्मती दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी यांनी दिली.
अधिक माहिती देताना गांधी म्हणाले,फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने महाराष्ट्रा सहित देशातील अन्य प्रोव्हीन्स मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि दक्षिण भारत येथून १००८ जैन धर्मियांना श्री सम्मेद शिखरजी यात्रा घडवण्याचा संकल्प करण्यात आला होता. जैन धर्मियांची काशी म्हणून ओळख असलेल्या श्री सम्मेद शिखरजीस जाण्याचे प्रत्येक जैन धर्मियांचे स्वप्न असते, सर्वच बांधव आर्थिक दृष्ट्या सक्षम नसतात,किंवा सदर यात्रा करण्यासाठी सोबत घरातील सहकारी नसतो. अशा व्यक्तीना सवलतीच्या दरात समूहाने शिखरजी दर्शन व त्यासोबत इतरही जैन धार्मिक स्थळांचे दर्शन घडवून आणण्याचे नियोजन केले आहे. स्वच्छता अभियान १२ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत संपन्न होणार आहे. तीर्थराज सम्मेद शिखरजी येथे यावर्षी महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश येथील १००८ हुन अधिक संख्येने जैन धर्मीय एकत्रित येणार असल्याने सदर स्वच्छता अभियानाची दखल ‘द गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड’ घेणार असल्याचेही गांधी यांनी सांगितले.
दौंड कॉर्ड लाईनवरून यात्रेकरू रवाना झाले त्यास येथील जैन समाजाचे नेते सुशील शहा, पूर्वा शहा, वर्धमान दोशी, प्रियांका दोशी यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सदर अभियान यशस्वी होण्यासाठी हुमड जैन समाज तसेच सेवा दलाचे विद्यमान अध्यक्ष अभिजित दोभाडा, संदेश गांधी, विरकुमार दोशी, नमन गांधी हुमड राष्ट्रीय अध्यक्ष विपीन गांधी, महामंत्री महेंद्र बंडी, महिला पदाधिकारी तनुजा शहा,संज्योत व्होरा यासह पदाधिकारी,आजी माजी अध्यक्ष,सदस्य संचालक परिश्रम घेत आहेत. महाराष्ट्र हुमड अध्यक्ष किरण शहा, मंत्री रविकिरण शहा, या अभियानामध्ये सहभागी संदीप शहा, केतन दोशी, महावीर शहा, सम्मेद शहा, सतीश व्होरा, प्रदीप झाडे, सागर भालेराव, रत्नकुमार फडे, काकासाहेब लोखंडे, आकाश गांधी, पियुष गांधी, पार्थ गांधी. हे सर्व परीक्षम घेत आहेत.