ताज्या घडामोडी
प्रमोद अनंतलाल दोशी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनीसाठी मार्गदर्शन शिबिर

प्रमोद अनंतलाल दोशी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनीसाठी मार्गदर्शन शिबिर
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 24/8/2025 :
रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगरचे सचिव व भारतीय जैन संघटना ग्रामीण विभाग सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद अनंतलाल दोशी यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोलीचे स्मार्ट गर्ल प्रोग्राम ट्रेनर रत्नाकर महाजन (राज्य कार्यकारिणी सदस्य भारतीय जैन संघटना, पुणे) यांचे विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे.
रत्नत्रय इंग्लिश मेडियम स्कूल व जुनियर कॉलेज मांडवे यांनी, सोमवार दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत रत्नत्रय इंग्लिश मेडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज मांडवे येथे आयोजित केलेल्या या शिबिरासाठी विद्यार्थिनीं बरोबरच पालकांनीही वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.