ग्रीन फिंगर्स महाविद्यालय उज्वल निकाल परंपरा कायम
ग्रीन फिंगर्स महाविद्यालय उज्वल निकाल परंपरा कायम
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 18/12/2023 :
ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी अकलूज अंतर्गत बीएससी ईसीएस व बी. सी.ए. प्रथम वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर ‘विद्यापीठ सोलापूर अंतर्गत ऑक्टोबर नोव्हेंबर 2023 परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून ग्रीन फिंगर्स कॉलेजचा निकाल दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उज्वल व घवघवीत लागलेला आहे .
विशेष म्हणजे यावर्षी देखील मुलींनी बाजी मारली आहे यामध्ये बी एस सी ईसीएस या शाखेचा निकाल 75 टक्के लागलेला आहे .
या प्रथम वर्षामध्ये 75 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये पास झालेले असून
४२ विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह पास झालेले आहेत .
यामध्ये बीएससी ईसीएस भाग १ मधील कुमारी अदिती अनिल पराडे हिला ८४.७५ टक्के गुण मिळाले असून महाविद्यालयांमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे .
तसेच कुमारी वैभवी विजय नागरे हिला ८२.७५ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळाला आहे व
कुमारी भूमिका विजयसिंह मगर हिने ८२.२५ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवलेला आहे .
तसेच बीसीए प्रथम वर्षा मधील सुर्यवंशी नेहा संतोष हिने ७९ .५०% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे .पिलाने आरती दत्तात्रय हिने ७७.७५% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे .
कुमारी रसाळ पायल संजय हिने ७५. ७५% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवलेला आहे .
कुमारी जावळे संजना राजेंद्र ७५ .५% मिळवून तृतीय क्रमांक मिळवलेला आहे .
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालय विकास समिती अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील सर्व व्यवस्थापन समिती सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . सुभाष शिंदे, उपप्राचार्य डॉ . महेश ढेंबरे विभाग प्रमुख डॉ .तुळशीराम पिसाळ , संजय साळुंखे, बाळासाहेब क्षीरसागर व सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले .