सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कॉग्निझंट प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या साफ्टवेअर कंपनी मध्ये निवड

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कॉग्निझंट प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या साफ्टवेअर कंपनी मध्ये निवड
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 23/5/2025 :
अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर मधील चतुर्थ वर्ष कॉम्पुटर सायन्स अँड इंजीनिअरिंग अभियांत्रिकी मधील कु.कविता रणदिवे मु.पो. फोंडशिरस या विध्यार्थीनीची कॉग्निझंट प्रायव्हेट लिमिटेड, पुणे येथील या नामांकित कंपनी मध्ये निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली. विभाग प्रमुख प्रा. सचिन पांढरे तसेच कॉम्पुटर सायन्स अँड इंजीनिअरिंग विभागातील सर्व प्राध्यापक यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या व्हॅल्यू अडॅडेड प्रोग्रॅम व ट्रेनिंग यामुळे या कंपनीत निवड होण्यास मदत झाली असे मनोगत कु. कविता रणदिवे यांनी व्यक्त केले.
सदर निवडी बद्दल ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालयाच्या विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी अभिनंदन केले.व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.