ताज्या घडामोडी

महाराष्ट्रात खोक्यांनी बोक्यांना घरचा रस्ता दाखवला

महाराष्ट्रात खोक्यांनी बोक्यांना घरचा रस्ता दाखवला

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 11/01/2024 :
काय आहे नाही सारीच आणि तितकीच भारी मजा ज्या बोक्यांनी मागील दीड वर्षांपूर्वी सत्तेत असताना अडीच वर्षांच्या काळात जे काही तुळीवर टांगलेल लोणी एकावर एक भ्रष्टाचाराचे त थर रचत जसं बेमालूमपणे ओरपल तेच बोके कालच्या आमदार अपात्रतेच्या निकालावरून इतके उताणे पाताणे पडून धाय मोकलून रडत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच वस्त्रहरण करून तमाम महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावत आहेत अशांचा बंदोबस्त कसा करणार , विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूला झुकले आहेत अशी बोंबाबोंब करणाऱ्या शिल्लक शिवसेनेच्या व तितक्याच अती शिल्लक किंवा चिल्लर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला फतवा यापुढे घ्यायचाय नाही त्यामुळे तो स्विकारण्याची किंवा त्यावर निर्णय घेण्याची गरज ज्यांना भासत नव्हती तेच सारे गलगंंड झालेले ब्राह्मण विरोधी बोके काल सायंकाळपासून चांगलेच सोकावले आहेत अर्थात यात काय नवल नाही कारण ते ‘चंदेरी रात में सत्ते के साथ में ‘ अशा दुनियेत जगत होते आणि आहेत .
या निकाला संदर्भात मागील दीड वर्षांपासून कधीच न्यायालयात कोणताही फुटकळ खटला न लढवलेले प्रख्यात कायदेपंडित आणि डोक्यावर केसाचा पत्ता नसलेले अती उल्हास नावाचे बापट अगदी तितक्याच कपटीपणाने उध्दव ठाकरे गटाची अशी काय विविध वाहिन्यांवर तळी उचलत होते त्यात त्यांना साथ देण्यासाठी दिवसागणिक ठाकरेंची चार वर्षांपूर्वींचे कट्टर विरोधक समाजविघातक पत्रकार त्यांची आजकाल साथ देत असल्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या मातोश्रीवर सत्ता नसल्याची झळ पोहचत नव्हती , पण कालचा निकाल लागताच बापटांचा उल्हास अगदी गुरू अमावास्याच्या सुर्योदयला मावळला असे वाटते , उध्दव ठाकरे यांच्या नाकाखालून किंवा नाकावर टिच्चून शिवसेनेचे तब्बल एक दोन नाही तर चाळीस आमदार दुसरा गट स्थापन करतात त्यावेळी ठाकरे गट काय गांजा ओढत होता का ॽ त्यांना या पडझडीची साधी जाणीव का झाली नाही ? का ते एकनाथ शिंदे यांना ग्रहीत धरून भिंतीला धरून रांगत रांगोळी काढत होते का ॽ असे सर्व काही प्रश्न उपस्थित होतात कारण उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा राजकीय काय तर त्यांचा शारीरिक अंत्योदय कार्यक्रम करण्याची योजना यापूर्वीच आखली होती त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत कोणतीही वाढ करू नये अशी सुचना सातारा वास्तवी असताना शंभूराज देसाई यांना केली होती हे कशाचे द्योतक आहे .
मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्तेसाठी सतत चलनी नाणं खणखणीत वाजत म्हणून वारेमाप वापर करून घेतला त्यातून त्यांनी त्यांची सत्ता जाण्यापूर्वी अयोध्येचा दौरा आयोजित केला पण त्यात एकनाथ शिंदे यांना हिडीसपिडीस पध्दतीची वागणूक दिली त्याचवेळी अनेक आमदार भानावर आले आणि या शिंदे समर्थक आमदारांची डाळ सत्तेच्या कुकरमध्ये शिजायला गेली , या दौऱ्यानंतर काही दिवसांत विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणूका लागल्या पण त्या व्यूह रचनेत एकनाथ शिंदे कुठेच नव्हते , इतकेच नाही तर याच काळात त्यावेळचे पर्याय नसलेले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सह्याद्री अतिथी गृहावर बालिशपणा करण्यात चिल्लर चर्चा करत होते पण बाहेर एकनाथ शिंदे हे युवराजला भेटण्यासाठी तब्बल दोन तास ताटकळत उभे होते आता बोला या महाराष्ट्रातील पप्पूच काय करायचं कारण सत्तेच्या माजातून आणि त्यातील पैशातून आलेली मस्ती उद्धव ठाकरे यांना नडली बाकी काही नाही. आता कुठं एवढं होऊनही शहाणे होतील तर ते उध्दव ठाकरे कुठले कारण ते आजही चंदेरी ग्लॅमर वर्ल्डच्या जगात वास्तव्य करत आहेत कारण त्यांच्या दिमतीला टिनपाट पत्रकारांची आणि उल्हासित राहणाऱ्या बापटांसह हसिम सरोटे या सडलेल्या वकीलांची फौज आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता सहानुभूतीच्या झऱ्यात वाहत आहे असं महाराष्ट्र विकास आघाडीला केवळ गुदगुल्या केल्या सारखं भासत आहे बाकी काही नाही आता लोकसभा निवडणुकीत मतदार यांना मतपेटीतून असे काही पोकळ बांबूचे फटके देईल की काय विचारूच नका तोपर्यंत आपलं तोंड बंद करा कारण सकाळचा विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांचा चॅरिटी शो बघायचा आहे तो कधीच विसरू नका म्हणजे नरेंद्र मोदी पुन्हा एकदा साडेतीनशे पार होऊन पंतप्रधान होणार हे नक्की आहे.

राजाभाऊ त्रिगुणे .
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button