“सातत्यपूर्ण प्रयत्नाने जीवनातील आव्हानांना सामोरे जावा” – कु . ईशिता धैर्यशील मोहिते पाटील

“सातत्यपूर्ण प्रयत्नाने जीवनातील आव्हानांना सामोरे जावा” – कु.ईशिता धैर्यशील मोहिते पाटील
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 08/04/2024 :
येथील ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी येथे बीसीए बीएससी ( ई सी एस ) अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ .तुळशीराम पिसाळ यांनी केले प्रास्ताविकावेळी ते म्हणाले ग्रीन फिंगर्स कॉलेज हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक माहिती तंत्रज्ञान देणारे उत्कृष्ट शिक्षण संकुल आहे .
या महाविद्यालयाचे शैक्षणिक प्रगती बरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्न करत असते . त्यासाठी प्रत्येक वर्षी ॲप्टीट्यूड टेस्ट व सॉफ्ट स्किल चे वर्कशॉप आयोजित केले जातात . तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध प्रकारच्या सांस्कृतिक , क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात . याप्रसंगी बोलताना पुढे म्हणाले महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यापीठ स्तरावर चांगले गुण मिळवून मेरिट लिस्ट मध्ये आलेले आहेत . अंतिम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांनी पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या .
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या शिवरत्न हॉर्स रायडिंग अकॅडमीचे अध्यक्ष माननीय कुमारी ईशिता धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होत्या . या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या आज आपण निरोप घेण्यासाठी इथे जमलो आहोत हा निरोप समारंभ शेवट नसून तुम्हा सर्वांसाठी एक नवीन सुरुवात आहे .
आज निरोप घेत असताना आपण हे लक्षात ठेवूया की जीवनात बदल हा एकमेव स्थिर आहे . आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आर्टिफिशियल इंटलिजन्स मध्ये रोज नवनवीन टेक्नॉलॉजी येत आहेत सर्व विद्यार्थ्यांनी नवीन टेक्नॉलॉजी टूल्स अवगत करून घ्यावे . भविष्यातील नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करा तसेच आपले महाविद्यालयाचे जे ऋणानुबंध निर्माण झाले आहे तसेच कायम राहू द्या .आज एका अध्याया चा शेवट व दुसऱ्या अध्यायाची सुरुवात झाली असून याप्रसंगी तुम्हा सर्वांना नवीन संधी सुचित करते .
या कार्यक्रमाप्रसंगी नॅक कॉर्डनेटर प्राध्यापक अनिल लोंढे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी ते म्हणाले निरोप समारंभ हा आपण सर्वांनी एकत्रित तयार केलेल्या आठवणींचा उत्सव असू द्या सर्व विद्यार्थ्यांनी भविष्यात नवीन अध्याय तयार करतील तसेच सर्वांचा प्रवास आनंद व यशाने भरला जावा ह्या शुभेच्छा त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिल्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ . सुभाष शिंदे अध्यक्षीय भाषणात म्हणाले हा क्षण प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील भावनिक क्षण आहे .सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर अनेक स्पर्धा कार्यक्रमा ऊत्सवामध्ये प्राविण्य मिळवलेले आहे . आजच्या प्रसंगी लक्षात ठेवा जसे जसे आपण मार्ग सोडतो तेव्हा लक्षात ठेवा की प्रत्येक शेवटी नवीन सुरुवात करण्याची संधी असते मला हा विश्वास आहे महाविद्यालयातून मिळालेले ज्ञान व अनुभव भविष्यातील आव्हानांसाठी तुम्हाला नक्की साहस देणारे आहे .
या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीएससी (ईसीएस ) प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी वैष्णवी खंडागळे व नक्षत्रा क्षीरसागर या विद्यार्थिनीने केले व आभार भूमी नगादे या विद्यार्थिनीने मांनले .
या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयीन विकास समिती सदस्य डॉ . विश्वनाथ आवड व शीतल मगदूम , उपप्राचार्य डॉ. महेश ढेंबरे, शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज चे प्राचार्य डॉ . अरविंद कुंभार बीसीए विभाग प्रमुख प्राध्यापक बाळासाहेब क्षीरसागर सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते .