श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा 52 व्या गळीत हंगाम शुभारंभ सोहळा संपन्न

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा 52 व्या गळीत हंगाम शुभारंभ सोहळा संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 24/10/2025 :
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सदाशिवनगर (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर ) यांच्या सन 2025-26 या वर्षातील 52 व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ सोहळा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि सौ. नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

प्रारंभी काटा व ऊसाने भरलेल्या बैलगाडीची पूजा मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडली. तर श्री सत्यनारायण महापूजा कारखान्याचे संचालक बाळासाहेब माने आणि सौ. अरुणा माने यांच्या हस्ते संपन्न झाली.
या प्रसंगी ऊस वाहतूक मुकादम, बैलगाडी चालक व ऊस उत्पादक सभासदांचा सन्मान चेअरमन आमदार रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तत्पूर्वी प्रतिमा पूजन झाले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार उत्तमराव जानकर, जि.प. सोलापूर उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, युवा नेते विश्वतेसिंह मोहिते पाटील तसेच व्हा. चेअरमन मिलिंद कुलकर्णी सहकार महर्षि व श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे आजी माजी संचालक , शिवामृत दूध संघाचे पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, विविध कार्यकारी सोसायट्यांचे चेअरमन व व्हा. चेअरमन, तसेच मोठ्या संख्येने शेतकरी सभासद, ग्रामस्थ व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

