शासनाच्या राज्य स्तरीय फ्लॉंरेंन्स नाईटिंगेल पुरस्काराने सौ. वंदना विनोद बरडे सन्मानित

शासनाच्या राज्य स्तरीय फ्लॉंरेंन्स नाईटिंगेल पुरस्काराने सौ. वंदना विनोद बरडे सन्मानित
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 14/05/2025 :
नर्सिंग क्षेत्रातील प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय फ्लाॅरेंन्स नाईटिंगेल आंतरराष्ट्रीय परिचारिका पुरस्काराने वंदना विनोद बरडे (सहायक अधीसेविका, ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर) यांना सन्मानित करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य मंत्री
प्रकाश आबीटकर व खासदार धर्यशील माने यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
दिनांक १२ मे २०२५ ला राजश्री शाहू महाराज सभागृह कोल्हापूर येथे महाराष्ट्र शासनाचा राज्य स्तरीय फ्लाॅरेंन्स नाईटिंगेल नर्सेस पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित खासदार धर्यशल माने, प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री, डॉ नितीन आंबाडेकर संचालक आरोग्य सेवा मंडळ मुंबई, डॉ पुरुषोत्तम मडावी उपसंचालक शुश्रुषा आरोग्य सेवा मंडळ मुंबई, डॉ निलिमा सोनवणे सह.संचालक शुश्रुषा आरोग्य सेवा मुंबई, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या राज्य स्तरीय एकूण सहा पुरस्काराचे वितरण करण्यात आले.