श्री महावीर जैन विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा
श्री महावीर जैन विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 01/05/2025 :
अकलूज ( तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) येथील श्री महावीर जैन विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा उत्साहाने साजरा करण्यात आला.
1 मे 2025 महाराष्ट्र दिना निमित्त शाळेत सकाळी ठीक 07:30 वाजता प्रमुख पाहुणे शशिल गांधी (C.A.) यांचे हस्ते आणि श्रीमती सुलभा शहा यांचे अध्यक्षतेखाली
ध्वजारोह करण्यात आले. या कार्यक्रमात इयत्ता पाचवीतील स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या चार विद्यार्थ्यांचा “प्रद्युम गांधी” यांच्या स्मरणार्थ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच शाळेतील पहिली ते सातवीत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने पास झालेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शालेय कमिटीचे सदस्य, शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.