शिवरत्नच्या माध्यामतून ९४ युवक-युवतींना TCS मध्ये नोकरीची संधी
शिवरत्नच्या माध्यामतून ९४ युवक-युवतींना TCS मध्ये नोकरीची संधी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 26/04/2025 : आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवरत्त्न शिक्षण संस्था आणि श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शिवरत्न नॉलेज सिटी, अकलूज येथे १६ एप्रिल रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांच्या सहकार्याने सोलापूर जिल्हा व माढा लोकसभा मतदारसंघातील तब्बल ९४ युवक-युवतींना TCS मध्ये थेट नोकरीची संधी प्राप्त झाली, ही गौरवाची बाब ठरली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या वाटा खुल्या करून देण्याच्या उद्देशाने घेतलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून शिवरत्न शिक्षण संस्था आणि श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट यांनी रोजगाराच्या संधी निर्माण करत तरुण पिढीला योग्य दिशा देण्याचे मोलाचे कार्य केले आहे.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील अनेक तरुणांचे आयुष्य उजळणार असून, अशा रोजगारप्रधान उपक्रमांची खरोखरच आज समाजाला नितांत गरज आहे.
🟦 “गावाकडच्या मुलांना अशी संधी मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. TCS सारख्या मोठ्या कंपनीत नोकरी लागल्यामुळे अतिशय आनंद आहे.हे शक्य झालं ते शिवरत्त्न शिक्षण संस्था आणि श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट यांनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यामुळे.तसेच मी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांनी संधी उपलब्ध करून दिली.”
– निखील राजेंद्र पवार,मंगळवेढा
🟪”शहरात जाऊन नोकरी शोधणं कठीण होतं, पण या मेळाव्यामुळे गावातूनच संधी मिळाली. TCS मध्ये काम करण्याची संधी मिळणं माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.” – गितांजली महादेव मगर, निमगाव ,ता.माळशिरस