पक्ष हिताची काळजी घ्या

अनावृत्त पत्र………..✍️
पक्ष हिताची काळजी घ्या
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 11/03/2025 :
आदरणीय देवाभाऊ
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
सप्रेम नमस्कार
आपण महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आहात, राजकारण विरहित काम करीत असताना, जनमानसाचा आदर राखणे, जनतेच्या भावनांना मान देणे, सामान्यांच्या अपेक्षापूर्ती करणे, ही आपली प्राथमिक जबाबदारी होय.
महोदय
नुकत्याच अकलूज येथे,8 मार्च रोजी झालेला आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांच्या मुलाचा भव्य दिव्य, लग्न सोहळा लाखोंचा उपस्थितीमध्ये पार पडला,
ही लाखोंची उपस्थिती मोहिते पाटील कुटुंबीयांवर असणाऱ्या जनतेच्या प्रेमाची पावती होय,
या सामान्य उपस्थित, व अनुपस्थित जनतेला असे वाटत होते की, आपण या लग्न सोहळ्या मध्ये उपस्थित राहून वधू-वरांना शुभ आशीर्वाद द्याल, व लाखोंची मने जिंकाल, अशी आमच्या सामान्य जनतेची खूप अपेक्षा होती, पण आपलीच नव्हे तर आपल्या पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी, खासदार आमदारांनी या सोहळ्या मध्ये अनुपस्थित राहून जनतेची नाराजी ओढवून घेतली, असेच म्हणावे लागेल.
हा लग्न सोहळा म्हणजे, त्या कुटुंबाचा सामान्य जनतेशी असणाऱ्या नात्यासमवेत होणारा आनंद उत्सव होता, व हे कार्यक्रम वधूवरांचा आयुष्यात होणारा एकमेव आनंद उत्सव होय,
अशाप्रसंगी उपस्थित राहून, वधूवरांना शुभाशीर्वाद देणे असे आपली संस्कृती शिकविते. पण आपल्या पक्षातील अनेक नेत्यांची अनुपस्थिती ही आम्हा सामान्यांना वेदनादायक वाटली.
कारण प्रथम राष्ट्र, मग समाज या ध्येयाने चालणाऱ्या आपल्या पक्षास हे शोभनीय नाही.
महोदय
2019 मधील निवडणुकी मध्ये आपण, जनतेला पूर्ण अनभिज्ञ असणारे उमेदवार, माढा व माळशिरस येथे पाठविले, व ते निवडून आणण्याची जबाबदारी मोहिते पाटील कुटुंबीयांवर सोपविली, व त्यानीही त्यांची जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण केली, पण 2024 मध्ये त्याच मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच अंशी पराभूत होतो, याचाही विचार झाला पाहिजे.
गेली तीन पिढ्या सामान्य जनतेच्या हिताशी मोहिते पाटील कुटुंबीयांची नाळ जोडली गेली आहे, सत्ता असो वा नसो, सामान्य जनता त्यांच्याकडे आधारवड म्हणूनच पाहते,
म्हणूनच त्यांच्या चौथ्या पिढीतील लग्नालाही लाखोंची उपस्थिती असते हेही लक्षात घ्या,
आदरणीय सर
एखाद्या कार्यकर्त्याला मोठे करण्यासाठी, त्यांची उमेदवारी लादणे, हे निश्चितच न्यायोचित नाही. कारण अनपेक्षित पणे मिळालेल्या, आमदारकी व खासदारकी मुळे ते स्वतःला स्वयंभू नेते समजू लागले.
व ज्यांच्या खांद्यावर उभे राहून आपण खासदार व आमदार झालो हे ते पूर्णपणे विसरून, मोहिते पाटील घराण्याच्या विरोधकांशी हात मिळवणी करून, मोहिते पाटलांना विरोध करणे एवढेच आपले कार्य आहे, असे समजून वागले. आणि त्याचीच परिणीती 2024 ला त्यांना भोगावी लागली,
2019 ला ज्यांना खासदारकी मिळाली, ते तर काँग्रेस संस्कृतीतून पुढे आलेले, जे कधीच सामान्यांच्या सुख दुःखात समरस होऊ शकले नाहीत, फक्त वरिष्ठांना खुश ठेवणे एवढेच यांचे काम.
हेच काम थोड्या बहुत फरकाने आमदार महाशयांनी केले. खासदारकीला पराभूत होऊन, परत आमदारकी तरी टिकवण्यासाठी, त्यांनी मोहिते पाटलांना विरोध करणे एवढेच आपले ध्येय ठेवले ,
एवढेच नव्हे तर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना कपडे काढून मारण्याची भाषा ही वापरून, आपल्या पुढील कार्याची दिशा व्यक्त केली आहे.
एकूणच वरील वरिष्ठांकडून लाभलेल्या या आमदार व खासदारांनी तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील, भारतीय जनता पक्षाची संघटना दुबळी केली, व मोहिते पाटलांना भारतीय जनता पक्ष सोडून जाण्यास भाग पाडले.
अजूनही साध्या बैलगाडी शर्यतीसाठी सुद्धा आदरणीय मुख्यमंत्र्यां कडून शेतकऱ्यांना आवाहन करावे लागते, हेच या माजी आमदार साहेबांचे कर्तुत्व सिद्ध करते.
सध्या या जोडीने रणजितसिंह मोहिते पाटलांच्या विरुद्ध संयुक्त आघाडी उघडून, त्यांना पक्षाबाहेर काढण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत, व स्वतःच्या अपयशाचे खापर रणजितदादांच्यावर फोडत आहेत.
पक्ष बांधणी कडे दुर्लक्ष करून, केवळ पारंपारिक मोहिते पाटील विरोधकांना एकत्रित करून, आपण किती कर्तुत्ववान आहोत हे ते दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आदरणीय सर,
एकूणच मोहिते पाटलां कडील लग्नास अनुपस्थित राहून आपण त्यांच्यावरील नाराजी व्यक्त करावयास नको होती, उलट आपली उपस्थिती, लाखो ना भावली असती.
पक्षातील काही मंडळींनी, आपली चांगलीच दिशाभूत केली आहे.
पक्षातील एक सक्रिय कार्यकर्ते श्रीकांतभारतीय यांचे बंधूही, विधानसभेला पक्षाने दिलेल्या उमेदवाराविरुद्ध लढले, व पराभूत ही झाले, रणजितदादांवर अन्याय करताना, श्रीकांत भारतीय यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.
अजूनही रणजितसिंह मोहिते पाटील भारतीय जनता पक्षातून मनाने बाहेर पडले नाहीत उलट ते शिर्डी येथील शिबिरास उपस्थित होते व एका दिवसात 1000 सभासद नोंदणी त्यांनी केलेली आहे . व आपली पक्षनिष्ठा दाखविली आहे,
उलट विरोधक पक्षनिष्ठा किंवा पक्ष बांधणी याकडे दुर्लक्ष करून केवळ मोहिते पाटलांच्या विरोधात काम करीत आहेत.
आज पर्यंतचा इतिहास पाहिला तर, केवळ मोहिते पाटलांना विरोध करून, तालुक्यात किंवा जिल्ह्यामध्ये ते यशस्वी होणार नाहीत. हे कृपया आपण लक्षात घ्या, हीच विनंती.
एक सामान्य नागरिक व
आपला हितचिंतक.