ताज्या घडामोडी

बाईपण भारी देवा…… महिला व्यवस्थापित मतदार केंद्राची सर्वत्र चर्चा

बाईपण भारी देवा……
महिला व्यवस्थापित मतदार केंद्राची सर्वत्र चर्चा

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhag⁵ywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

माळशिरस प्रतिनिधी दिनांक : 08/05/2024 :
४३ माढा लोकसभा अंतर्गत २५४ माळशिरस विधानसभा मतदारसंघात माळशिरस आणि सदाशिवनगर येथे महिला व्यवस्थापित मतदान केंद्र तयार केले होते. सगळीकडे या दोन केंद्रांची चर्चा आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजया पांगारकर आणि तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील महिला तलाठी मंडळ अधिकारी तसेच नायब तहसीलदार सायली जाधव आणि माळशिरस व सदाशिवनगर येथील मतदान कर्तव्यावर असलेल्या सर्व महिला अधिकारी, कर्मचारी, बी एल ओ यांनी अनेक कल्पक गोष्टींचा वापर करून पूर्ण मतदान केंद्राची सजावट इकोफ्रेंडली केलेली होती. देशामध्ये सर्वच क्षेत्रात महिलांनी उत्तुंग भरारी घेतलेली असून सर्वांसाठी मार्गदर्शक ठरलेल्या महिलांचे फोटो व त्यांचे कार्य यांची ओळख मतदान केंद्रावर दिसून आली. एखाद्या क्षेत्रात महिलांनी ठरवल्यानंतर किती बदल घडू शकतो हे या दोन मतदान केंद्रांना भेट दिल्यानंतर दिसून येते. कमीत कमी खर्चात अतिशय सुंदर सजावट केल्यामुळे येणाऱ्या प्रत्येक मतदाराला याचे कौतुक वाटल्या वाचून राहीले नाही . यामध्ये मतदान केंद्रांवर प्रशासनाने चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे ‘आबाल’ वृद्धांचा मतदानासाठी उत्साह दिसून आला. मतदान केंद्रांवर दिव्यांगा साठी सोयी करण्यात आल्या होत्या.

महिला मतदान केंद्रावर येथील सेल्फी पॉईंटवर असणारा संदेश…
“सावित्रीच्या लेकी आम्ही सर्व क्षेत्रात आमची भरारी, मतदानाचे कर्तव्य बजावणार⁶ आम्ही देशाच्या सशक्त नारी” महिलांचे कर्तव्य सिद्ध करतो अशी माहिती नोडल अधिकारी किरण मोरे यांनी दिली.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button