“शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हाधिकारी व जिल्हा बँक येथे 11 एप्रिल रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे”- विठ्ठल राजे पवार

“शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हाधिकारी व जिल्हा बँक येथे 11 एप्रिल रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे”- विठ्ठल राजे पवार
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 10/04/2025 :
शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हाधिकारी व जिल्हा बँक येथे 11 एप्रिल रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी केले आहे.
शेतकऱ्याची नाशिक जिल्हा बँक सहकार क्षेत्रातील उद्योजक व्यापारी दलाल साखर सम्राट सहकार सम्राट तसेच भ्रष्टाचारी उद्योजकांनी अडचणीत आणल्यामुळे नाशिक जिल्हा बँक के चे शेतकरी सभासद खूप मोठ्या अडचणीत सापडलेले आहेत त्यांना व बँक वाचवण्यासाठी 11 एप्रिल ला महत्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे या बैठकीला राज्य सहकारी बँकेचे चेअरमन विद्याधर अनस्कर व संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निबंध व आर्थिक संकटात सापडलेल्या नागरी सहकारी बँका पतसंस्था तत्कालीन अशासकीय सदस्य विठ्ठल राजे पवार हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
11 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक व जिल्हा बँक नाशिक येथे थकबाकीदार इमानदार शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विठ्ठल राजे पवार यांनी केले आहे. यावेळी संघटनेचे नाशिक जिल्हाप्रमुख अण्णासाहेब खैरनार, एडवोकेट शारदा राजे पवार शिवाजी शेजवळ एडवोकेट श्रीकांत मोरे एडवोकेट रोहन कोर शंकर गायके दिलीप शिवाजी पाटील दीपक त्रंबक यांनी 11 एप्रिल रोजी नाशिक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कष्टकऱ्यांना केले आहे.
=====================
महाराष्ट्र तसेच नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार..