नाशिक जिल्ह्यातील खाजगी मार्केट व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक फसवणुकी संदर्भात दोन दिवसात निर्णय घ्या.! अन्यथा पणन संचालनालय, सहकार विभागाला कलम कसायामुळे विभागालाच टाळे ठोकावे लागेल.. विठ्ठल राजे पवार.!

नाशिक जिल्ह्यातील खाजगी मार्केट व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक फसवणुकी संदर्भात दोन दिवसात निर्णय घ्या.!
अन्यथा पणन संचालनालय, सहकार विभागाला कलम कसायामुळे विभागालाच टाळे ठोकावे लागेल.. विठ्ठल राजे पवार.!
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 10/04/2025 : नाशिक जिल्ह्यातील खाजगी मार्केट व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक फसवणुकी संदर्भात दोन दिवसात निर्णय घ्या.! अन्यथा पणन संचालनालय, सहकार विभागाला कलम कसायामुळे विभागालाच टाळे ठोकावे लागेल. असा इशारा शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी दिला असल्याची माहिती महासंघाचे राज्य संपर्क व प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी दिली.
देवळा तालुक्यातील फ्री रामेश्वर मार्केट तसेच खाजगी कृषी मार्केटमध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपये अडकलेले आहेत या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने आंदोलन आणि तक्रारी करत आहेत मात्र सहकार विभाग आणि पणन संचालनालय या बाबींकडे दुर्लक्ष करत आहेत वास्तविक पाहता शेतकऱ्यांनी शेतमाल विकल्याच्या नंतर ४८ तासाच्या आत मध्ये शेतकऱ्यांना शेतमालाची संपूर्ण रक्कम अदा केली पाहिजे मात्र गेल्या तीन ते चार महिन्यांपासून शेतकऱ्यांनी विविध प्रकारचा शेतमाल खाजगी बाजार समित्यांमध्ये विकलेला आहे आणि खाजगी बाजार समिती यांना सहकार, पणन विभागाची मान्यता आहे त्यामुळे सहकार आणि पणन विभागाने शेतकऱ्यांच्या खाजगी बाजारांमधील आडते व्यापारी दलाल बाजार समितीकडे अडकलेल्या पैशाच्या संदर्भामध्ये दोन दिवसात निर्णय घ्या अन्यथा सहकार पणन संचालनालयाला विभागातील कलम कसायांमुळे टाळे ठोकावे लागेल वेळप्रसंगी आंदोलन तीव्रत छेडण्याचा इशारा शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना, महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी आज नाशिक येथे पत्रकारांना सांगितले शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारी संदर्भात ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी त्यांनी नाशिक विभागातील पणन सहकार विभागाचे प्रमुख डी डी आर तसेच पणन संचालक रसाळ साहेब आणि संबंधितांशी त्यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधलेला आहे, यावेळी संघटनेचे पदाधिकारी व आर्थिक लूट व फसवणूक झालेले शेतकरी उपस्थित होते अशी माहिती संघटनेचे जिल्हाप्रमुख अण्णासाहेब खैरनार, सोमनाथ वाकचौरे , शिवाजी शेजवळ, एडवोकेट रोहन कोर, एडवोकेट श्रीकांत मोरे पदाधिकारी उपस्थित होते.