ताज्या घडामोडी

औरंग्याची कबर अजितदादांचा गड उध्वस्त करणार काय ?

औरंग्याची कबर अजितदादांचा गड उध्वस्त करणार काय ?

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 23/03/2025 :
हिंदू द्वेषाने पछाडलेल्या क्रुरकर्मा औरंगजेबाने आपल्या देशात विशेषतः महाराष्ट्रात जो काही विध्वंस केला आणि आपली मुस्लिम जुलमी सत्ता राबवून हिंदू देवदेवतांची केवळ विटंबनाच केली नाही तर त्यांची मंदिरे उध्वस्त केली अशा अवलादीला धडा शिकवत त्याची जी सध्याच्या संभाजीनगर परिसरातील खुलताबाद येथील कबर उध्वस्त करण्याचा चंग विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनी प्रतिगामी स्वरूपात बांधला त्यामुळे सैरभैर झालेल्या औरंग्याच्या काॅंग्रेसरुपी काही अवलादी चांगल्याच वळवळल्या आहेत , परिणामी अशा काही वळवळणाऱ्या अवलादी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांच्या गटात नवाब मलिक यांच्या रुपाने तग धरून आहेत त्यामुळे त्यांची राजकीय लगबग सुरू झाली तर त्यात काही नवल नाही परिणामी आगामी काळात बाबरी मशिद जशी कारसेवकांनी उध्वस्त केली तशीच खुलताबादची औरंग्याची कबर आगामी काळात जर उध्वस्त झाली तर महाराष्ट्रात अजितदादांचा गट सत्तेच्या सारिपाटावरून भाजप व शिवसेना युतीला टांग मारू शकतो हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वेगळे मनसुबे काही दिवसांत अधिक स्पष्ट होतील .
याचा अर्थ महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा असला तरी अजितदादा गटातील नवाब मलिक नावाची पिलावळ अशा परिस्थितीत अजिबात शांत बसणार नाही कारण ते औरंग्याच्या कबरीचे रक्षक आहेत त्यामुळे असे रक्षक सत्तेच्या तुकड्यांना लाथ मारत सत्तेतून बाहेर पडले तर त्यामुळे सरकारवर काडीचाही विपरीत परिणाम होणार नाही , तथापि औरंग्याची कबर आगामी काळात बाबरी सारखी उध्वस्त झालीच तर नवाब मलिक व त्यांची आमदार कन्या सना मलिक अजितदादांची साथ देतील अशी अपेक्षा कोणीही ग्राह्य धरु नये इतकेच काय तर मलिकांची तळी उचलताना अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पूर्वाश्रमीची काॅंग्रेस पक्षाची एकनिष्ठ असणारी आणि केवळ ईडीचा दांडका नको म्हणून महायुतीचे भुई बनणारे बहुतेक आमदार अजितदादा पवार यांच्यावर राजकीय कुरघोडी करत दबाव आणतील आणि त्यांना सत्तेच्या लालीतून बाहेर पडण्यासाठी मजबूर करतील असा माझा राजकीय तर्क आहे .
विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आज जे औरंग्याच्या कबरीचे केवळ उदात्तीकरण केले जाते ही बाब तर ऐरणीवर आणली शिवाय त्यांचा मुद्दा केवळ कबरीच्या उदात्तीकरण करण्याच्या विरोधात नव्हता तर या खुलताबादच्या कबरीला सुरुंग लावून ती उध्वस्त करण्याचा होता त्यामुळे तर त्यांनी राज्यभर एकाच वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या कबरीचे जागोजागी प्रतिकात्मक उच्चाटन करण्यासाठी भलं मोठं आंदोलन करत शासनाला गर्भित इशारा देत आगामी काळात ही कबर जर जमीनदोस्त केली नाही तर तमाम हिंदू बांधव ही कबर बाबरी मशीद सारखी कारसेवा करत उध्वस्त करतील असा अल्टिमेटम दिला आहे , त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच महायुतीच सरकार आतून पुरत पोखरून गेले नाही तर त्यात नवल नाही कारण याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काॅंग्रेसचे राज्यातील नवनिर्वाचित भुईकरी हर्षवर्धन सपकाळ यांनी औरंग्यापेक्षा फडणवीस हे क्रुर शासनकर्ता असल्याची उपमा देऊन भाजपला डिवचले आहे , मग त्याचा परिणाम उरल्यासुरल्या काॅंग्रेसला भोगावा लागणार याचा अर्थ आज ना उद्या रातोरात खुलताबादची ही कबर कितीही पोलिस बंदोबस्त असला तरी उध्वस्त केली जाईल हेही शासनकर्ते ग्रहित धरुन आहेत , पण याचा विपरीत परिणाम अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर होणार असून त्यांच्या काही औरंग्याच्या पिलावळीला महायुतीतून बाहेर पडण्याची नामी संधी मिळणार आहे .
राजकारणात जरतरला अजिबात महत्त्व नसलं तरी आगामी काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना या माध्यमातून भाजपला डोईजड होऊन त्यांच्या सौदेबाजीचा भाव चांगलाच वधारणार आहे मग त्यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यावेळी नेमकी कोणती धुर्त चाल खेळत सरकार वाचवणार का ॽ याच मुद्यावर पुनश्च मध्यावधी निवडणुकांचा बिगुल वाजणार का ॽ फडणवीस अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस काय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पुन्हा एकदा खिंडार पाडणार ? हे येणारा काळ ठरवेल पण यामुळे केवळ अजितदादा पवार यांच्या गडालाच नाही तर एकनाथ शिंदे यांच्या गडालाही या निमित्ताने सुरुंग लागू शकतो कारण ‘ थंडा करके खावो ‘ म्हणणारे महाराष्ट्राच्या राजकारणातील महनीय शरदचंद्र पवारसाहेब हेआजकाल यावर मूग गिळून गप्प बसले आहेत त्यामुळे राज्यातील राजकारणात पुढील काळात बरीच उलथापालथ होईल अशी शंका घ्यायला वाव आहे , पाहू .

राजाभाऊ त्रिगुणे , सातारा .
दिनांक -१७/०३/२०२५ .
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button