ताज्या घडामोडी

सुनीता विल्यम्स 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतल्या; फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर ड्रँगनचं यशस्वी लँडिंग

सुनीता विल्यम्स 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतल्या; फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर ड्रँगनचं यशस्वी लँडिंग

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 19/03/2025 : 9 महिन्यांची दीर्घ प्रतिक्षा अखेर संपुष्टात आली आहे. अंतराळवीर सुनीता विलियम्स निक हेग, बुच विल्मोर आणि अलेक्जेंडर गोर्बुनोव यांच्यासोबत पृथ्वीवर सुरक्षित परतल्या आहेत. स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टद्वारे सर्वांना पृथ्वीवर आणण्यात आलं. लँडिंग झाल्यानंतर ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून बाहेर येताच सुनीता विलियम्स, निक हेगसह सर्व अंतराळवीरांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ड्रॅगन स्पेसक्राफ्टच्या यशस्वी लँडिंगनंतर सुनीता विलियम्ससह सर्व अंतराळवीरांना एक-एक करुन बाहेर काढण्यात आलं. यानातून बाहेर येताच सुनीता विलियम्सने कॅमेऱ्याकडे पाहून हसली आणि हात हलवला. तिच्या चेहऱ्यावर 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतल्याचा आनंद स्पष्टपणे दिसत होता.

स्पॅलशडाऊन साइटच्या जवळपास तैनात केलेल्या रिकव्हरी शिपमधील दोन स्पीड बोट ड्रॅगन कॅप्सूलमधील अंतराळवीरांच्या मदतीसाठी लगेच तिथे पोहोचल्या. त्यांना बाहेर येण्यासाठी मदत केली. कॅप्सूलची तपासणी पूर्ण झाल्यानंतर ड्रॅगनचे दरवाजे उघडून अंतराळवीरांना बाहेर काढलं. सर्वप्रथम निक हेग हे स्पेसक्राफ्टच्या कॅप्सूलमधून बाहेर आले. कॅप्सूलमधून बाहेर येताच निक हेग यांनी कॅमेऱ्याच्या दिशेने हात हलवून आपला आनंद व्यक्त केला.

 

स्पेसएक्सच कॅप्सूल सोमवार-मंगळवार दरम्यान रात्री एक वाजण्याच्या सुमारास आंतरराष्ट्रीय अवकाश तळावरुन निघालं. हवामान अनुकूल असल्याने अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर फ्लोरिडा येथे पाच वाजून 57 मिनिटांनी भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री 3 वाजून 27 मिनिटांनी स्प्लँशडाऊन केलं. अवकाश यानाच्या लँडिंगला स्प्लँशडाऊन म्हणतात.
सुनिता विलयम्स यांच्यासह बुच विल्मोर, निक हेग आणि रशियाचे अंतराळवीर अलेक्सांद्र गोरबुनोव यांचीसुद्धा घरवापसी झाली. यावेळी ड्रॅगन कॅप्सुल ज्यावेळी समुद्रात उतरलं तेव्हा चार पॅराशूटच्या मदतीनं त्याचं पाण्यावर स्प्लॅशडाऊन झालं. समुद्रात ते लँड झाल्यानंतर 10 मिनिटांसाठी या स्पेसक्राफ्टचं सिक्युरिटी चेक करण्यात आलं. नियमानुसार हे कॅप्सुल लगेचच उघडता येत नसून त्याच्या अंतर्गत भागातील तापमान आणि बाह्य भागातील तापमानाचं परीक्षण केल्यानंतरच ते उघडण्यात येतं. कॅप्सुल जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतं तेव्हा ते इतकं उष्ण होतं की त्याचं बाह्य आवरण पूर्णत: लालबुंद होतं. ज्यामुळं समुद्राच्या पाण्यात उतरल्यानंतर त्याचं तापमान सामान्य होण्याची प्रतीक्षा केली जाते. इथंही ही संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर आणि स्पेसक्राफ्ट पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्यातील अंतराळवीरांना स्ट्रेचरवरून बाहेर काढण्यात आलं.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button