सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे राज्य स्तरीय टेक्निकल इव्हेंट टेक्नो फेस्ट 2K25 स्पर्धेमध्ये यश

सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे राज्य स्तरीय टेक्निकल इव्हेंट टेक्नो फेस्ट 2K25 स्पर्धेमध्ये यश
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 06/10/2025 :
श्रीराम पॉलिटेक्निक कॉलेज पानीव येथील महाविद्यालयामध्ये अभियंता दिना निमित्ताने पार पडलेल्या “राज्य स्तरीय – टेक्निकल इव्हेंट टेक्नो फेस्ट 2K25” मध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामधील डिप्लोमा सिव्हिल विभागाच्या विद्यार्थांनी भाग घेतला त्यामध्ये अजय तुपसौंदर व पृथ्वीराज अमराळे यांनी “ब्रिज मॉडेल मेकिंग” या इव्हेंट मध्ये प्रथम क्रमांक व कॅड रेस मध्ये जयराज भिंगारदिवे यांनी द्वितीय क्रमांक मिळवुन
घवघवीत यश मिळाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली सदर यशा बद्दल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालयाच्या विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, यांनी अभिनंदन केले.व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.
पदविका सिव्हिल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. देशमुख आर. वाय., तसेच प्रा. डांगरे ए. ओ. यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.