ॲड. अमित अनंतराव कारंडे यांनी केला गिरीष प्रभाकर शेटे यांचा सत्कार

ॲड. अमित अनंतराव कारंडे यांनी केला गिरीष प्रभाकर शेटे यांचा सत्कार
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 08/10/2025 :
ॲड. अमित अनंतराव कारंडे प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (काँग्रेस प्रांताध्यक्ष कार्यालयाशी संलग्न), यांनी काँग्रेसचे माळशिरस तालुका नूतन अध्यक्ष गिरीष प्रभाकर शेटे यांचा सत्कार केला.
गिरीश शेटे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये बुधवार दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी संपन्न झालेल्या या सत्कार सोहळ्याप्रसंगी साप्ताहिक अकलूज वैभव आणि पाक्षिक वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, ॲड. शरफू मलिक शेख, हारुण इब्राहिम सय्यद, अविनाश उत्तम जगताप, निलेश जालिंदर पगारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांनी प्रदेश सरचिटणीस ऍड अमित आनंतराव करंडे यांचे आपल्या संपर्क कार्यालयात आगमन होताच स्वागत केले.