मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 17/03/2025 : आपल्या मनाच्या विविध स्थिती असतात. ज्या भावना मनात असतात त्या चेहऱ्यावर दिसतात. डोळ्यात दिसतात. तसेच शब्द ओठातून बाहेर पडतात. भावना व्यक्त होतात.
क्वचित प्रसंगी भावना दडपून ठेवून वरवर सर्व ठीक आहे असे वागले – बोलले जाते. अर्थात त्यामुळे काहीवेळा फसवणूक पण होते.रागाच्या भरात बोलणे, चिडणे हे प्रकार अनेकदा त्रासदायक घडतात. मनावर बंधन राहिले नाही तर यामधून गुन्हे घडू शकतात.
त्यामुळे आपल्या भावनांवर आपले नियंत्रण हवे हे नक्की. मनाने आपल्यावर स्वार होता कामा नये. आपण मनावर ताबा मिळवला तर सुख-दुःख जो प्रसंग येईल तो सम पातळीवर हाताळता आला पाहिजे. रागावर नियंत्रण हवे. मनात सकारात्मक विचार हवेत.
आजचा संकल्प
_आपली संगत व संस्कार यामधून आपला स्वभाव घडतो. मनातील विचारांप्रमाणे कृती घडते.म्हणून सज्जनांची संगत धरू व सद्विचारांनी सदवर्तन करू._
_- सौ. स्नेहलता स. जगताप._