आता कोणाचा कान चावणार ?
आता कोणाचा कान चावणार ?
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे
मुंबई दिनांक 16/03/2025 : आपण लहानपणापासून आईच्या कान चावलेल्या आरोपीची कथा ऐकत आलो आहे
एक लहान मुलगा त्याच्या लहानपणी एक चोरी करतो त्याची आई त्याच्या चुकीवर पांघरूण घालते
बघता बघता पहिली चोरी पचल्याने तो मुलगा अट्टल दरोडेखोर होतो त्याच्या गुन्ह्याबद्दल पकडला जाऊन त्यास फाशीची शिक्षा होते शिक्षेच्या दिवशी त्याला शेवटची इच्छा विचारल्यावर तो आपल्या आईची भेट मागत तो आई भेटायला आल्यावर आईशी बोलताना तो आईचा कान चावतो व आईला म्हणतो माझी पहिली चोरी तू पचवली नसतीस तर मी गुन्हेगार झालो नसतो व आज मला फाशी झाली नसती.
या गोष्टीची आज आठवण यायचे कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे जाणते नेते शरद पवार यांनी ही धनंजय मुंडे यांच्या बाबत अलीकडेच एक विधान केले आहे
शरद पवार म्हणाले आहेत या धनंजय मुंडे ला मी कोण कोणत्या गंभीर कृत्यातून वाचवले आहे फडणवीस त्याचा तपास करून गुन्हे दाखल करणार असले तरी ही माहिती मी सरकारला द्यायला तयार आहे.
हे विधान ऐकल्यावर महाराष्ट्रातील अनेक लोक अचबित झाले असावेत.
आपणास माहित असेल जर एखाद्या गुन्हेगाराचे कृत्य माहित असून ते आपण पोलिसांना कळवले नाही तर आपण पण तेवढेच गुन्हेगार आहोत.
धनंजय मुंडेंनी काय काय अपराध केले आहेत व शरद पवाराना माहित आहेत हे सर्व महाराष्ट्र समोर येणे अतिशय आवश्यक आहे.
यामध्ये खून, बलात्कार, देशद्रोह अगर भ्रष्टाचार अशी गंभीर विषय असणार. अशा गंभीर विषयात केवळ आपला राजकीय समर्थक म्हणून त्याला वाचवणे व हे वाचवणे बेकायदेशीर रित्या वाचवणे आहे. याचा अर्थ शरद पवार यांनी आपले नाव, आपली सत्ता, वजन वापरून धनंजय मुंडे यांना वाचवले आहे.
ज्याप्रमाणे या गंभीर अपराधा मध्ये धनंजय मुंडे हे गुन्हेगार आहे त्यांना वाचवणारे शरद पवारही तेवढेच गुन्हेगार आहेत.
त्यांच्यात जरा जरी हिंमत असेल व समाजाबद्दल व देशाबद्दल कळकळ असेल तर त्यांनी राज्य सरकारची वाट न पाहता धनंजय मुंडे यांचे सर्व गुन्हे जाहीर करावेत, उघडकीला आणावेत म्हणजे ज्या कोणा व्यक्तीवर धनंजय मुंडे यांनी अन्याय केला आहे, अत्याचार केला आहे त्यांना न्याय मिळेल व धनंजय मुंडे यांना शिक्षा होईल अगर गंभीर गुन्हे असल्यास फाशी होईल.
त्यावेळी मात्र धनंजय मुंडे कोणाचा कान चावणार?
अनिल रुईकर
98 232 55 049
इचलकरंजी