ताज्या घडामोडी

असे दीनदयाळ पुन्हा होणे नाही

असे दीनदयाळ पुन्हा होणे नाही

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 16/03/2025 : 11 फेब्रुवारी हा दिवस माझ्या स्मरणात राहण्याचे कारण म्हणजे 11 फेब्रुवारी 68 ला मी एसएससीच्या परीक्षेच्या तयारीत होतो माझा अभ्यास यथातथाच असायचा पण माझे बंधू अविनाश हे मेरिट लिस्ट मध्ये येण्याच्या शक्यतेतील विद्यार्थी होते
अजब श्रद्धांजली
मला त्यादिवशी सकाळी माझ्या वडिलांनी दोन पुस्तकांची नावे लिहून दिली व कोल्हापूरला जाऊन अजब पुस्तकालयातून तु ही पुस्तके घेऊन ये ही तुम्हाला अभ्यासाला उपयोगी पडतील म्हणून सांगितले
मी कोल्हापूरला गेलो भवानी मंडपाशी पोहोचलो अजब पुस्तकाच्या दारात गेलो पण त्यादिवशी अजब पुस्तकालय बंद होते पुस्तकाच्या दुकानाच्या मालकांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे श्रद्धांजली म्हणून पुस्तक दुकान आज बंद ठेवत आहोत असा बोर्ड लावून दुकान बंद ठेवले होते
*एकमेव अजब
संपूर्ण कोल्हापुरात दीनदयाळजींच्या मृत्यूबद्दल श्रद्धांजली म्हणून एकच दुकान बंद होते हे माझ्या स्मरणातून कधीही जाणार नाही.
नेते घडवणारा नेता
पं उपाध्याय म्हणजे भारतीय जनसंघाचे वैचारिक नेतृत्व होय सारे आयुष्य प्रचारक म्हणून प्रथम संघ प्रचारक व नंतर जनसंघाचे प्रचारक म्हणून त्यांनी काम केले अटल बिहारी वाजपेयी , बलराज मधोक, नानाजी देशमुख अशा नररत्नांची घडवणूक दीनदयाळजीनी केली आहे
कार्यकर्त्यांचे उंबरे झिजवणारा नेता
गांधी हत्त्ये नंतर जे संघ परिवारात कार्यकर्त्यांचा तुटवडा होता त्यावेळी दीनदयाळ जी छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांच्या घरी स्वतः जात व त्यांना जनसंघाच्या कार्यात भाग घेण्यास उद्युक्त करत
कोल्हापूर जनसंघातील सुरुवातीचे कट्टर कार्यकर्ते गोपाळराव जी माने हे माझ्या अतिशय निकटचे होते त्यांच्या वयात व माझ्या वयात सुमारे 35 वर्षाचे अंतर होते पण गोपाळरावजी माझ्याशी मित्रत्वाच्या भावनेने वागत त्यांनी सांगितलेल दीनदयाळजींची आठवण
टांग्यातून येणारा राष्ट्रीय नेता
गांधी हत्ये नंतर कोल्हापूर सारख्या ब्राह्मण ब्राह्मणे तर वादाचे केंद्र असलेल्या शहरात संघाचे अगर जनसंघाचे काम करणे म्हणजे सुळावरची पोळी असे
त्यावेळी या वातावरणामुळे काही दिवसांसाठी गोपाळराव मानेनी
जनसंघाच्या कामात भाग घेण्याचे बंद केले होते
एके दिवशी सकाळी ते आपल्या घरात असताना त्यांच्या दाराशी एक टांगा उभारला कोण पाहुणे आलेत म्हणून पाहतात तर दीनदयाळ उपाध्याय
दीनदयाळजीआले इतर गप्पा गप्पा मारल्या तू कामात का नाहीस हे पण विचारले नाही पण संध्याकाळच्या एका बैठकीचे आमंत्रण दिले चहा घेऊन पुन्हा निघून गेले कै गोपाळराव मानेना आपल्या निष्क्रिय पणाबद्दल शरम वाटू लागली व इतका मोठा माणूस फक्त एका बैठकीचे निमंत्रण देण्यास आपणास आला याबद्दल धन्यता वाटली
या एका भेटीने गोपाळराव माने पुन्हा जनसंघाच्या कामाला लागले ते त्यांच्या मृत्यूपर्यंत कामातून कधीही हटले नाहीत
पत्रावळीत जेवणारा राष्ट्रीय अध्यक्ष
कै गोपाळराव मानेंनी मला आणखीन एक आठवण सांगितली
एकदा जनसंघाच्या कार्यकर्त्यांच्या शिबिरात जेवणाच्या वेळी पंक्ती वाढल्या होत्या एका कार्यकर्त्याला खूप भूक लागली होती तो वाढणाऱ्या कार्यकर्त्यावर मला अजून काही वाढले नाही म्हणून ओरडत होता दीनदयाळजीनी
ते पाहिले व आपले भरलेले ताट त्या कार्यकर्त्यासमोर घेऊन ठेवले
एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष इतर कार्यकर्त्यांच्या बरोबर पत्रावळी वर जेवत होता व आपणास उशिरा जेवण मिळाले तरी चालेल पण आपले कार्यकर्ते आधी जेवले पाहिजेत अशी वृत्ती बाळगत होता.
भाजपा सकट सर्वच राजकीय पक्ष आता पंचतारांकित बैठकी व पंचतारांकित जेवणावळी करत आहे पण राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष सामान्य कार्यकर्त्यांच्या पंक्तीमध्ये पत्रावळीमधील जेवत होता हे आताच्या कार्यकर्त्यांना अगर नेत्यांना पटणार नाही व माहीतही नसावे
असे होते आमचे दीनदयाळजी
आज त्यांची पुण्यतिथी राम अवध व भरत अवध या दोन तथाकथित चोरानी त्यांच्या वस्तू चोरण्यासाठी म्हणून त्यांचा खून केला अशी कथा रचली गेली व जनसंघाचा मेंदू मारण्याचा प्रयत्न त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी केला.
आज मला माहित नाही भाजपच्या किती कार्यालयात व किती नेत्यांनी दीनदयाळजीना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त स्मरण करून श्रद्धांजली वाहिली
पण मी त्यांना विसरू शकलो नाही व विसरणार नाही
शत शत प्रणाम

ॲड. अनिल रुईकर
98 232 550 49
इचलकरंजी

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button