श्रीमंत महाराजा मल्हारराव होळकर यांची जयंती वाफगाव किल्ला येथे होणार – योगेश राजे होळकर

श्रीमंत महाराजा मल्हारराव होळकर यांची जयंती वाफगाव किल्ला येथे होणार – योगेश राजे होळकर
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 11/03/2025 : महाराजा यंशवंतराव होळकर स्मारक समिती महाराष्ट्र व होळकर परिवार वाफगाव यांच्या वतीने श्रीमंत महाराजा मल्हारराव होळकर याची जयंती वाफगाव किल्ला येथे भव्यतेने साजरी होणार आहे अशी माहिती यशवंतराव होळकर उत्सव समिती अध्यक्ष योगेश राजे होळकर यानी दिली असल्याची माहिती वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन सल्लागार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी सांगितली.
रविवार दि. 16, मार्च 2025 रोजी सकाळी “11 वाजता श्रीमंत महाराजा यंशवंतराव विदयालय वाफगांव ता.खेड जि.पुणे येथे इंदौर साम्राज्याचे संस्थापक महाराजा मल्हारराव होळकर जयंती सोहळा भव्यतेने साजरा करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू असून या सोहळ्यात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन योगेश राजे होळकर यांनी केले आहे.