ताज्या घडामोडी

ग्रीन फिंगर्स महाविद्यालया मध्ये महिला दिन साजरा

ग्रीन फिंगर्स महाविद्यालया मध्ये महिला दिन साजरा

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 10/03/2025 :
शिवरत्न नॉलेज सिटी येथील ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्यूटर टेक्नॉलॉजी व शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला .
याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्राध्यापिका चैताली पिसे म्हणाल्या ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो . या दिवशी महिलांच्या हक्कासाठी व त्यांच्या सन्मानासाठी व त्यांच्या योगदानाची ची जाणीव करून देणारा हा दिवस महत्वाचा मानला जातो. पूर्वीच्या काळी महिलांना अनेक बंधने होती त्यांना शिक्षण , नोकरी व निर्णय घेण्याच्या संधी मिळत नव्हत्या. पण आता काळ बदलला आहे . महिलांनी शिक्षण ,नोकरी, क्रीडा, विज्ञान अनेक क्षेत्रात मोठे यश मिळवलेले आहे .
त्या पुरुषांच्या बरोबरीने कष्ट करून समाजाच्या विकासात योगदान देत आहेत .महिलांचे रक्षण करणे व त्यांना समान वागणूक देणे ही आपली जबाबदारी आहे . त्यांना समान अधिकार व सुरक्षित वातावरण मिळणे त्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे .उपस्थित सर्व विद्यार्थिनीं आपले शिक्षणास प्राधान्य देऊन ते सर्वप्रथम पूर्ण करावे व आपण आपल्या पायावर उभे राहावे असे त्यांनी मार्गदर्शन केले .उपस्थित सर्व मुलींना व महिलांना त्यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या .
तसेच याप्रसंगी ग्रीन फिंगर्स महाविद्यालयाच्या प्राध्यापिका धनश्री हातोळकर  उपस्थित मुलींना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, महिला सक्षमीकरण हा दिवस आपल्या देशाच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचा आहे .भारताला सक्षम व महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने महिलांचे सक्षमीकरण आवश्यक आहे . प्रत्येक महिला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकते व लढू शकते . महिला मानसिक दृष्ट्या सक्षम झाली तर ती कोणत्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त करू शकते . महिलांच्या सक्षमीकरणात मानसिक व शारीरिक सुदृढते बरोबर आर्थिक दृष्ट्या त्यांना स्वतंत्र बनवले पाहिजे . प्रत्येक महिलाही आर्थिक , सामाजिक व मानसिक दृष्ट्या सुरक्षित व स्वतंत्र असली पाहिजे . महिला सक्षमीकरणात कायदा व सुव्यवस्था याची भूमिका महत्वपूर्ण आहे त्यामुळे सर्व मुलींनी व महिलांनी कायद्याचे विशेष ज्ञान घेतले पाहिजे .
याप्रसंगी प्राध्यापिका रिजवाना काझी यांनी सर्व उपस्थित विद्यार्थीनी ना व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आभार प्राध्यापिका स्नेहा दाहिंजे यांनी मानले .
महिला दिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी विविध महिलांच्या वेशभूषा केलेल्या होत्या . जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातर्फे सर्व महिला शिक्षकांचा व कर्मचाऱ्यांचा सन्मान संपन्न करण्यात आला .

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button