माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे 81 व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील
यांचे 81 व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 12/06/2025 :
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील(माजी संसद सदस्य (लोकसभा) यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त गुरूवार दि.12 जून 2025 रोजी सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना व विजयरत्न सहकारी पशु-पक्षी संवर्धन संघ या संस्थांमार्फत कामगार कल्याण केंद्र, शंकरनगर येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले. रक्तदान शिबीराचे उद्घाटन शंकरनगर ग्रामपंचायत उपसरपंच सत्यशील राजसिंह मोहिते-पाटील, यांच्या हस्ते संपन्न झाले. सदर प्रसंगी इंडियन मेडिकल असोशिएशन, अकलूज चे डॉ.संतोष खडतरे, ब्लड बँकेचे डॉ.अजित गांधी व त्यांचेकडील स्टाफ त्याचबरोबर कारखान्याचे अधिकारी, युनियन प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते.
रक्तदान शिबीरामध्ये कारखाना व विविध संस्थांचे कर्मचारी, शंकरनगर परिसरातील युवक, महिला, नागरीक यांनी रक्तदान शिबीरामध्ये सहभाग घेऊन रक्तदान केल्याने मानवी जीव वाचविण्यास मदत होईल, अशा सामाजिक कार्यात सहभाग घेतल्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र केरबा चौगुले यांनी आभार मानले.
सदर रक्तदान शिबीर आयोजन करणेकरीता सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना, विजयरत्न सहकारी पशु-पक्षी संवर्धन संघ या संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी व कामगार युनियन यांनी सहकार्य केले आहे.