अखिल भारतीय सरपंच परिषद संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी सुरजा योगेश बोबडे यांची निवड..!

अखिल भारतीय सरपंच परिषद संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी सुरजा योगेश बोबडे यांची निवड..!
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
टेंभूर्णी /प्रतिनिधी दिनांक 09/02/2025 :
अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदी टेंभुर्णीच्या सरपंच सुरजा योगेश बोबडे यांची आज निवड करण्यात आली.
“आज मला महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हा सन्मान माझ्यासाठी केवळ पद नसून गावपातळीवरील लोकशाही बळकट करण्याची एक मोठी जबाबदारी आहे. मी सदैव ग्रामविकास आणि सरपंचांच्या हक्कांसाठी कार्यरत राहणार असून, सरपंच परिषदेच्या माध्यमातून गावागावातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहीन. माझ्या या प्रवासात मार्गदर्शन करणाऱ्या सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी, सहकारी आणि गावकरी बांधवांचे मनःपूर्वक आभार! आपल्या सर्वांच्या सहकार्याने गावांचे प्रश्न सोडवू,
विकासाची नवी दारे उघडू!”– जिल्हाध्यक्ष सुरजा बोबडे
त्यांच्या या निवडीबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच महाराष्ट्रातील सरपंच परिषदेच्या सदस्यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या.