ताज्या घडामोडी

विनम्र , निगर्वी, त्यागी आणि समाजउपयोगी उपक्रमशिल मिहिर बाहुबली गांधी

लेखक : ऍड अविनाश टी काले , अकलूज ता माळशिरस , जिल्हा सोलापूर मो न 9960178213

विनम्र , निगर्वी, त्यागी आणि समाजउपयोगी उपक्रमशिल मिहिर बाहुबली गांधी

Akluj Vaibhav News Network.

Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.

Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharastra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 23/11/2023 :
मिहिर भाई बाहुबली गांधी , हे अकलूज विभागातील प्रतिष्ठित नाव आजच्या घडीला झाले आहे. याचे कारण त्यांच्या सामाजिक , धार्मिक आणि व्यक्तिगत योगदान यात आहे.
फक्त उक्ती न करता ते प्रत्यक्षात कृती करतात. ज्याचा आदर्श समाजाने घ्यावा. मुळात शांती प्रिय असलेला जैन समाज हा धार्मिक दृष्ट्या अल्पसंख्य असलेला समाज परंतु भगवान महावीर यांच्या विचारसरणी चे पालन प्रत्यक्षात तत्वज्ञान आणि व्यवहारिक पातळीवर करून जगणारा असल्याने हा समाज समग्र देशात , आणि जागतिक पातळीवर सुद्धा दुधात साखर विरघळून जावी व समग्र दूध त्याने गोड करावे तसे तो मिसळून गेलेला आहे.
या समाजात मिहिर भाई यांचा जन्म झाला. आणि हे व्यक्तित्व इतके उंच होईल असे कुणालाच वाटले नसते. याचे कारण सुरुवातीचे त्यांचे जीवन अतिशय खडतर गेले.
पारंपारिक दृष्ट्या , त्यांचे आजोबा हे ही व्यापारी च होते. आणि असे असताना ही स. मा. वि. सारख्या शिक्षण संस्था उभ्या राहत असताना ज्यांनी देणग्या दिल्या त्यात त्या काळी 5000/_रुपये इतकी देणगी देण्याची दानत आणि शक्ती त्यांच्यात होती. हा वारसा त्यांचे वडिलांनी पुढे चालवला. परंतु दुर्दैवाने अचानक ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले. आणि त्यांचा सर्व सांभाळ आई ने केला. या काळात त्या कुटुंबाने केलेला संघर्ष मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिला आहे , पण त्यांच्या आई नी ही त्यांच्या मुलावर संस्कार केले. आई आणि आजी ज्या आज हयात नाहीत त्यांनी हे कुटुंब आदर्श कुटुंब म्हणून उभे केले‌. कठोर परिश्रम हा त्यांचे उन्नती चा पाया आहे. पण संस्कार व्यक्तिगत पातळीवर न राहता ते सामाजिक व्हावे म्हणून त्यांनी कांहीं युवकांना एकत्रित केले आणि श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशिय अल्पसंख्याक संस्था स्थापन केली.
या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र व्यापी जैन समाजाचे 7 वेळा वधुवर मेळावे त्यांनी आयोजित केले. व्यक्तिगत स्तरावर 27 वेळा रक्तदान करून एक आदर्श निर्माण करतानाच सन्मती सेवा दलाच्या माध्यमातून 16.वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन करून युवक वर्गाला रक्तदान करण्यास उद्युक्त केले.
जैन समाजाचे आदर्श असलेली धार्मिक स्थळे व त्या परिसरातील स्वच्छता अभियान हा तर दर वर्षीचा त्या संस्थेचा उपक्रम राहिला.
जैन मुनी आल्यानंतर त्यांच्या निवास व्यवस्था करणे, जैन समाजाचे युवक मेळावे याचे आयोजन करणे असे अनेक उपक्रम ते करत राहिले. याचा शुभ परिणाम त्यांच्या व्यक्तिगत जीवनात झाला आणि एक आदर्श व्यक्ती म्हणून त्यांची जडण घडणं होत गेली.
हुमड जैन समाज फेडरेशन चे राष्ट्रीय महामंत्री म्हणून त्यांची नियुक्ती जैन समाजाने केली.
विसा हुमड दिंगबर पंथीय जैन मंदिर पंचायती वाडा अकलूज याचे विश्वस्त पदावर ते कार्यरत आहेत. तर प्रथमाचार्य शांती सागर महाराज जी पालखी पदयात्रा बारामती ते कुंथलगिरी याचे सचिव पद त्यांचे कडे आहे.
श्री भा. दि. जैन जैन तीर्थक्षेत्र कमिटी किंवा महा समिती याचे ते महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहेत. सदाशिवनगर येथील रत्नत्रय एज्यूकेशन सोसायटी चे खजिनदार म्हणून ते काम पाहतात.
समाजाचा पूर्ण विश्वास संपादित करण्यात ते यशस्वी ठरले म्हणूनच
श्री दिंगबर जैन ग्लोबल महासभा चे महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या उपाध्यक्ष पदी त्यांना मान सन्मान पूर्वक नियुक्त करण्यात आले.
मी धार्मिक दृष्ट्या जैन समाजाचा नाही. परंतु माजी सैनिक विरकुमार दोशी यांच्या समवेत कांहीं उपक्रम आम्ही जैन समाजाचे आयोजित केले होते. महावीर भाई अगदी लहान असल्या पासून आमचे घराशी संबंधित आहेत. एक कौटुंबिक आस्था आमच्यात अस्तित्वात आहे. मिहिर भाई यांची पत्नी सौ. सारिका या माझ्या मानस कन्या आहेत. त्यांची मुले सोहम आणि कन्या समृद्धी माझ्या खांद्यावर खेळली जी आज कॉलेज जीवनात पोहचली आहेत. मिहिर भाई यांचे लहान बंधू विशाल भाई , आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ रुपाली हेही फारच प्रेमळ स्वभावाचे आहेत. आणि या कुटुंबांची सर्वात लहान सदस्य गोंडस मुलगी आर्वी माझा जीव की प्राण आहे.
यातूनच श्री मिहिर गांधी यांना मिळालेल्या पुरस्कार आणि त्यावरील माहिती ने माझे लक्ष वेधून घेतले.
आणि मनात आले , अश्या व्यक्तित्व चां परिचय समाज व्यवस्थेला झालाच पाहिजे. म्हणून ही शब्द फुले गुंफून हा अल्पसा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
हा फार छोटा प्रयास आहे जो अपुरा आहे. एका बाजूला त्यांचे पूर्ण जीवन आहे जे सामाजिक त्याग , आणि त्या साठीचे परिश्रम यावर आधारित आहे. निसर्ग समतोल राखण्यासाठी युवकांनी वाढदिवस साजरा करताना केलेले हजारो वृक्षाचे वृक्षा रोपण असेल , किंवा कोणत्याही समाजातील गरजू व्यक्तींना मदत करण्याची भूमिका असेल , निराधार , एच आय व्ही ग्रस्त बालकांना सांभाळणाऱ्या संस्था ना आर्थिक मदत देणे असो त्यांच्यात सहकुटुंब मिसळून सहभोजन करणे असो असे अनेक उपक्रम मी पाहिले आहेत. जे डॉ. प्रकाश जी आमटे यांच्या उपक्रमा शी जवळीक साधतात. पण आपला त्याचे शी परिचय नसतो
किंवा अति परिचय अवमूल्यन होत असते. अकलूज ला भूषण वाटावे असे हे उपक्रम आहेत. ज्याचा सार्थ अभिमान आमच्या सारख्यांना वाटतो. हा प्रवास असाच चालत रहावा‌ नित्य उपक्रमशील राहून आदर्श युवकांची फळी कार्यरत राहावी या शुभकामना देऊयात इतकेच,,,,,,,

लेखक :
ऍड अविनाश टी. काले , अकलूज
ता. माळशिरस , जिल्हा सोलापूर
मो.न. 9960178213

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button