ताज्या घडामोडी

“राजीनामे खिश्यात आणि सत्ता घश्यात”

“राजीनामे खिश्यात आणि सत्ता घश्यात”

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 21/01/2025 : 2014 साली महाराष्ट्रत भाजप सत्तेवर आली प्रथम शिवसेना त्यांच्याबरोबर नव्हती पण नंतर राजकीय गरज म्हणून भाजप व शिवसेना या दोघांनाही युतीचे राज्य चालवावे लागले
आपणास तो काळ आठवतो का दररोजच्या दररोज उद्धव ठाकरे व त्यांचे शिवसेनेतील सहकारी भारतीय जनता पक्षाला व फडणवीस यांना राजीनामे खिशात आहेत अशी धमकी देत होते राजीनामे खिश्यात ठेवून त्यांनी काही प्रमाणात का होईना सत्ता घश्यात घातली व त्या सत्तेचा जो काय वापर करायचा तो केलाच
हिन्दुत्वाला सोडचिठ्ठी
2019ला तर एकदम परीस्थिती बदलली उद्धव ठाकरेंनी एकदम आपल्या विचारसरणीच्या विरुद्ध व शिवसेनेच्या जन्मापासून शिवसेना नष्ट करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या काँग्रेस आघाडी बरोबर जमवून घेऊन सत्ता मिळवली त्या अडीच वर्षाच्या काळात त्यांनी जेवढा म्हणून सत्तेचा गैरवापर करता येईल तो केलाच
गौहाटी ते गोवा
अडीच वर्षानंतर शिवसेनेमध्ये फूट पडली व एकनाथ शिंदे यांनी 40-45 आमदार बाजूला काढले व पुन्हा एकनाथ शिंदे शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांचे सरकार सत्तेवर आले त्यावेळी भारतीय जनता पक्षाकडे 115 च्या आसपास आमदार होते व शिंदेंच्याकडे 40- 42 आमदार होते
केंद्रीय नेतृत्वाचा दूरदर्शीपणा
शपथविधीच्या दिवसापर्यंत नव्हे क्षणापर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशीच चर्चा होती पण ऐनवेळी दिल्लीहून एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून आले फडणवीसा सकट भारतीय जनता पक्ष मध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्व यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून पक्षाचे नुकसान केले असे बोलले जाऊ लागले
पण भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेतृत्व हे विलक्षण चाणाक्ष व धूर्त आहे त्यांनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करून एक मोठा डाव साधला जर उलट झाले असत फडणवीस मुख्यमंत्री व एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तर जे आता गेले दोन दोन तीन महिने चाललेले आहे ते अडीच वर्षापूर्वी सुरू झाले असते प्रत्येक बाबतीत नाराजी धुसपुस दरेकरवाडी चे दौरे सुरू झाले असते व दरवेळी त्यांच्या नाकदुर्या काढत भाजपला व फडणवीस यांना त्रासाचे झाले असते
अटलजी अनुभव
हा अनुभव अटल बिहारी पंतप्रधान असताना भारतीय जनता पक्षाने अनेकांना आपल्याजवळ ठेवताना त्यांनी भारतीय जनता पक्ष व त्यांचे नेतृत्व यांना कसे लाचार केले होते हा इतिहास सर्वांना माहीत आहे
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंडळींनी जर त्यांना मागील वेळी मुख्यमंत्रीपद मिळाले नसते तर त्यांनी हेच केले असते त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करून भारतीय जनता पक्षाने विलक्षण चाणाक्षपणा दाखवला
आपण आता एकदा मुख्यमंत्री झालो आहे आपल्याकडे आमदार कमी असताना सुद्धा आपल्याला मुख्यमंत्री केले आता भारतीय जनता पक्षाकडे 132 आमदार असताना आपल्या 56 आमदारांच्या बळावर आपल्याला मुख्यमंत्री करावे ही एकनाथ शिंदेंची एकमेव इच्छा होती
उपमुख्यमंत्र्याचे कोपगृह
ती इच्छा पूर्ण न झाल्याने मंत्रिमंडळ वाटप ,पालकमंत्री पद वाटप या प्रत्येक वेळी दरेकर वाडीला चार चार दिवस जाणे, फोन न उचलणे, कोणालाही न भेटणे हे प्रकार सुरू झाले आहेत
यश एकट्याचे आहे?
त्यांना हे लक्षात येत नाही जरी आपले 56 आमदार आले असले तरी या यशात भारतीय जनता पक्ष, त्यांचे केंद्रीय नेतृत्व ,संघाच्या कार्यकर्त्यांचे प्रचंड प्रयत्न यामुळे पण आपणास थश मिळालेले आहे
आता पुन्हा राजकीय धमकी सत्र सुरू होईल यांचे राजीनामे तयार राहून खिशात असतील व सत्तेचा घास मात्र त्यांना सोडवणार नाही
म्हणून या लेखाचे शीर्षक “राजीनामे खिश्यात व सत्ता घश्यात” असे दिले आहे

ॲड. अनिल रुईकर
98 232 55 049
इचलकरंजी

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button