उज्जैनकर फाउंडेशनच्या वतीने आयोजित संमेलनात “ओळख श्री ज्ञानेश्वरी आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा” परिसंवाद संपन्न

उज्जैनकर फाउंडेशनच्या वतीने आयोजित संमेलनात “ओळख श्री ज्ञानेश्वरी आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा” परिसंवाद संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 17 जानेवारी 2025 :
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या व आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या 745 व्या सप्तशतकोत्तर जन्म महोत्सवी वर्षानिमित्त शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर जि. जळगाव आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ ,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने देवाची आळंदी येथे संमेलन संपन्न झाले.
संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज साहित्य नगरी आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज व्यासपीठ मोरया मंगल कार्यालयात संमेलनाचे उद्घाटन निवेदक सुधीर गाडगीळ याच्या हस्ते, बाल साहित्यिक प्रा. सुमती पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाले. याप्रसंगी राज्यभरातून साहित्यिक, रसिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन सत्रा नंतर संमेलनाचे संयोजक श्री ज्ञानेश्वर चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांच्या अध्यक्षतेखाली ओळख श्री ज्ञानेश्वरी हा परिसंवाद झाला. परिसंवादाचे सूत्रसंचालन विकास शिवले यांनी केले. या परिसंवादात फाउंडेशनचे राज्याध्यक्ष डॉ.सुभाष बागल, विदर्भ विभागीय अध्यक्ष डॉ.पंढरीनाथ शेळके, ह. भ प. वृषाली गायकवाड, विदर्भ विभागीय उपाध्यक्षा डॉ. लता थोरात, अकोला जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. डॉ. वैशाली कोटंबे आदींनी सहभाग नोंदवला.
दुसऱ्या सत्रामध्ये ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली ठेंग यांच्या अध्यक्षतेखाली व संमेलनाचे सह निमंत्रक डॉ. ज्ञानेश्वर पाटील यांच्या विशेष उपस्थितीत ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा परिसंवाद संपन्न झाला. यामध्ये मराठवाडा विभागीय संपर्कप्रमुख ह. भ. प. गणेश आघाव, पश्चिम महाराष्ट्र विभागीय सल्लागार सौ. ज्योती पुजारी, ह. भ. प. गोरख महाराज नरवडे आदींनी सहभाग घेऊन त्या विषयावर आपले विचार मांडले. प्रसंगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ, निमंत्रक सौ. रूपाली चिंचोलीकर, सहकार्याध्यक्ष रामचंद्र कुऱ्हाडे पाटील, उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य आयोजक डॉ. शिवचरण, खजिनदार सौ. संगीता उज्जैनकर यांच्यासह दोन्ही परिसंवादात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच पुणे ,आळंदी येथील रसिकांनी दाद दिली.