ताज्या घडामोडी

लॅपटॉपवर टायपिंग करण्याची झंझट संपणार; मिनिटांत सुरू करून घ्या वॉइस एक्सेस फीचर

लॅपटॉपवर टायपिंग करण्याची झंझट संपणार; मिनिटांत सुरू करून घ्या वॉइस एक्सेस फीचर

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 17 जानेवारी 2025 :
तुमचा लॅपटॉप वापरण्याचा पद्धत Voice Access मुळे आता अधिक सोपी आणि स्मार्ट होणार आहे. टाइपिंग, ब्राउजिंग किंवा मल्टीटास्किंग करताना तुमच्या कामाची सोय करण्यासाठी Windows ने एक प्रभावी फिचर तयार केले आहे. हे वैशिष्ट्य तुमच्या दैनंदिन कामांमध्ये सहजता आणि गती वाढवेल. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला कोणतेही थर्ड पार्टी अ‍ॅप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही.
Voice Access म्हणजे काय?
Voice Access ही Windows मधील इनबिल्ट फिचर आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही लॅपटॉप पूर्णपणे आवाजाच्या कमांड्सने चालवू शकता. बाहेरील कोणत्याही सॉफ्टवेअरची गरज न पडता, हे साधन तुम्हाला फायली उघडणे, ईमेल टाइप करणे, अ‍ॅप्लिकेशन्स उघडणे किंवा सिस्टीम शटडाऊनसारखी कामं सहजतेने करण्याची सुविधा देते.
Voice Access कसं सुरू करायचं?
जर तुम्हालाही तुमच्या लॅपटॉपला आवाजाने कंट्रोल करायचं असेल, तर खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा.
1. सर्च बार उघडा.
Windows Key + S दाबून लॅपटॉपवरचा सर्च बार उघडा.
2. Voice Access शोधा.
सर्च बारमध्ये ‘Voice Access’ टाइप करा आणि सर्च करा.
3. Voice Access सुरू करा.
“Do you want to continue and set up Voice Access?” असा मेसेज दिसेल. तिथे Yes, Continue या पर्यायावर क्लिक करा.
4. मायक्रोफोन सक्रिय करा.
Voice Access सुरू झाल्यानंतर, लॅपटॉपचा मायक्रोफोन चालू असल्याची खात्री करा.
5. कमांड्स द्या आणि कामाला लागा.
आता फक्त आवाजाने तुमच्या लॅपटॉपला कमांड्स द्या आणि तुमचं काम सुरळीत सुरू करा.
Voice Access च्या मदतीने काय काय करता येईल?
Voice Access सुरू केल्यानंतर तुम्ही खालील कामं सहज करू शकता.
फायल किंवा अ‍ॅप्लिकेशन्स उघडणे आणि बंद करणे.
मोठे ईमेल्स किंवा डॉक्युमेंट्स टाइप करणे.
सेटिंग्समध्ये नेव्हिगेट करणे.
सिस्टीम शटडाऊन किंवा रीस्टार्ट करणे.
कुणासाठी उपयुक्त आहे Voice Access?

हँड्स-फ्री कामासाठी काम करताना हात मोकळे ठेवायचे असल्यास ही सुविधा उत्तम आहे. मोबिलिटी चॅलेंज असलेल्या व्यक्तींसाठी ज्यांना शारीरिक हालचालींच्या मर्यादा आहेत, त्यांच्यासाठी हे फिचर वरदान ठरेल.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button