ताज्या घडामोडी

शूऽऽऽऽऽ.. महाराष्ट्र झोपला आहे

संपादकीय…………..✍️

शूऽऽऽऽऽ.. महाराष्ट्र झोपला आहे

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
अकलूज दिनांक 13 जानेवारी 2025 :
ज्या राजकीय-प्रशासकीय-न्यायालयीन अभद्र युतीने, न्या. लोया यांचा खून पचवला आहे, त्या युतीला एका सरपंचाच्या खूनाच्या मुख्य सूत्रधाराला पाठीशी घालणे काही मोठी गोष्ट नाही. विशेषतः जेव्हा तो मुख्य सूत्रधार, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्याचा, दोन पिढ्यांपासूनचा पाळीव गूंड आहे. महाराष्ट्र न्या. लोयांच्या खूना नंतर ही शांत होता, डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पांसरे यांचे खून झाले तेव्हा ही शांत होता, भ्रष्टाचारामुळे महाराजांचा पुतळा पडला तेव्हा ही शांत होता, पक्ष फोडून सत्ता स्थापन केली तेव्हा ही शांत होता आणि पुढे ही शांतच राहील. IAS आणि IPS यांना राजकीय खूनांमध्ये काही ही करता आलेले नाही हा आजपर्यंतचा भारताचा इतिहास आहे. महाराष्ट्र त्याला कधीकाळी अपवाद ठरलेला.
पण आता ती अपेक्षा फोल आहे. २०१४ नंतर प्रशासनात फार हिम्मत उरलेली नाही, हे स्पष्ट आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विलासी आयुष्यात एका सरपंचाच्या खूनामुळे काही फरक पडणार नाही. पुढचा खून कुणाचा ? एवढंच बघत राहायचं. कुशासनामुळे झालेले खून, यावर ना चर्चा ना शोक. गरिब रोजच मरत आहेत, कधी औषधाला पैसा नाही म्हणून तर कधी पुरेसे अन्न मिळाले नाही म्हणून तर कधी आणखी काही ‘शुल्लक’ कारण. महाराष्ट्र आता शांत, थंड, असंवेदनशील झाला आहे. सगळे सरंजामदार आणि मराठे ‘संपत्ति रक्षक’ झाले असल्यामुळे त्यांची मनगटं कमकुवत झाली आहेत. त्यांच्या विलासी जिवनशैलिला जेलची कोठडी आणि कारावास सहन होणार नाही. त्यांनी सत्तेशी सौदा केला आहे, आपली ओळख, आपली मनगटं, त्यांनी सत्तेच्या टाचेखाली कधीच दिलेली आहेत.
मराठी बाणा आणि कणा, दोन्ही ‘हिंदूत्वाची’ हूजरेगिरी करण्यात व्यस्त आहे. शूऽऽऽऽऽ महाराष्ट्र झोपला आहे. साभार अज्ञात.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button