निर्भय बनो आणि काॅंग्रेस छोडो

निर्भय बनो आणि काॅंग्रेस छोडो
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 12/02/2024 :
उध्दव ठाकरे यांच्या शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भगदाड पडत असताना काॅंग्रेस पक्षाचा वाडा चिरेबंदी कसा राहिला ? याचा खल सुरू होता तितक्यात आज दुपारच्या सुमारास या वाड्याचा मोठा बुरुज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या रुपाने एकाएकी ढासळला आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे व त्यांच्या बगळ्यांनी चार दिवसांपूर्वी ‘ निर्भय बनो ‘ चा दिलेला नारा प्रत्यक्षात अंमलात आला , परिणामी अशोक चव्हाण यांनी काॅंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आपली भाजपकडे जाण्याची वाट तांत्रिक दृष्ट्या मोकळी करून घेतली आता त्यांचा येत्या पंधरा तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मराठवाडा दौऱ्यात त्यांचा भाजप प्रवेश होईल अशी माझी माहिती आहे .
काॅंग्रेस पक्षात आजपर्यंत कोणा आमदार किंवा खासदारावर पक्ष श्रेष्ठींकडून अन्याय झाला असला तरी ते काॅंग्रेस पक्षात तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करत बसायचे पण जेंव्हा पासून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि त्यांच्या कुमार सप्तर्षी , असीम सरोदे व विश्वंभर चौधरी या बगळे चौकडीने ‘ निर्भय बनो ‘ चा नारा देत गावोगावी जाऊन जो अश्लील भाषेत भाजपच्या नेत्यांना शिव्याशाप देण्याचा धांगडधिंगा शरदचंद्र पवारसाहेब आणि उध्दव ठाकरे यांच्या माध्यमातून बिदागी घेऊन सुरू केला तेंव्हापासून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे काॅंग्रेस छोडो साठीचे मनोबल इतके कमालीचे वाढले की त्यांनी डायरेक्ट स्वतःला काॅंग्रेस मुक्त करून घेतले , अर्थात याच सर्व श्रेय हे निखिल वागळे आणि त्यांच्या कंपूला जितके जाते तितकेच ते काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जाते कारण नानाचा मुजोरपणा पक्षात इतका पराकोटीचा वाढला आहे की ज्यामुळे केवळ अशोक चव्हाणच नाही तर त्यांच्या बरोबर माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे अमित व धीरज देशमुख हे दोन्ही चिरंजीव आणि पश्चिम महाराष्ट्रातील आणखी तीन चार आमदार शिवाय मराठवाड्यातील आणखी चार आमदार यांचा येत्या पंधरा तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भाजप प्रवेश निश्चित आहे .
‘ एकेला देवेंद्र क्या करेगा ‘ ! असं सुनावणाऱ्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना आता कळून चुकले असेल की ‘ एकेला देवेंद्र ही काफी है ‘ ! अहो या सर्व घटनेमुळे महाराष्ट्रातील काॅंग्रेस पक्षालाच काय तर महाविकास आघाडीला चांगली घरघर लागली आहे कारण बघता बघता विरोधी पक्ष औषधाला तरी शिल्लक राहतो की नाही इतकी विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे , अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेशानंतर लागलीच या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या राज्यसभेची उमेदवारी तर मिळणार आहे शिवाय त्यांच्या कन्येला नांदेडच्या भोकरदन विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर पाठविले जाणार आहे त्याचबरोबर अशोक चव्हाण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मच्या मंत्री मंडळात केंद्रीय मंत्री सुध्दा असणार आहे त्यामुळे चव्हाण यांना सत्य साईबाबांचा खऱ्या अर्थाने आशिर्वाद मिळाल्यात जमा आहे .
मागील दहा वर्षात राहुल गांधी यांनी काॅंग्रेसच्या हवेलीची अक्षरशः झोपडी करून ठेवली आहे त्यामुळे या झोपडीत राहायला आजकाल कुणी तयार नाही कारण काॅंग्रेसच्या मुळात पंडित जवाहरलाल नेहरू यांची छानछौकी संस्कृती रुजली आहे त्यामुळे ते सत्ते शिवाय अजिबात जगू शकत नाहीत कारण सत्ता नसेल तर त्यांच्या जिवाची घालमेल झाली म्हणून समजा मग त्यासाठी ते कोणताही मागचा पुढचा विचार न करता निखिल वागळे यांच्या भाषेत निर्भय बनतात हे कसं विसरून चालेल त्यामुळे भाजपच्या कोणाही कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या बाबत अजिबात आक्रमक भूमिका घेऊन आततायीपणा करू नये कारण जितक्या पोटतिडकीने वागळे आणि त्यांची चौकडी ‘ निर्भय बनो ‘ चा नारा देतील तितक्या लवकर महाविकास आघाडीला घरघर लागेल हे विसरू नका हेही तितकंच खरं आहे असो पाहू पुढे आणखी काय काय होत ते तूर्तास इतकेच.
राजाभाऊ त्रिगुणे .
दिनांक -१२/२/२०२४
पत्रकार,जेष्ठ राजकीय विश्लेषक