ताज्या घडामोडी

जो खानदानी रईस है ओ ,,,, मिजास रखते है नर्म अपना ,,,,,

जो खानदानी रईस है ओ ,,,, मिजास रखते है नर्म अपना ,,,,,

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 16/02/2024 : जो खानदानी रईस है ओ,,,, मिजास रखते है नर्म अपना ,,,,,
ही गझल शबीना अजीज यांनी लिहिली आहे आणि अतिशय सुरेल आवाजात कुमार सत्यम यांचे द्वारा ही गझल गायली जात होती आणि नकळतपणे त्यातील भावार्थ पाहून
वर्तमानातील राजकीय परिस्थिती डोळ्या समोरून तरळून गेली ,,,
राजकारणात असलेलं खानदानी पण किती महत्वाचे असते याचीही प्रचिती या निमित्ताने आली.
यातील पुढचा शेर असा होता
तुम्हारा लेहेजा बता रहा है तुम्हारी दौलत नई नई है ,,,
जरासा कुदरत ने क्या नवाजा की आकें बैठे हो पहली सक मे,,,,,,
1960साला पासून सुरू झालेला मोहिते पाटील यांच्या उच्च स्तरीय संसदीय राजकारणातील प्रवास हा या सोलापूर जिल्ह्याची दशा बदलवून त्याला प्रगतीची दिशा देणारा होता.
सहकार आणि शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करीत माळशिरस तालुका च नाही तर करमाळा , आणि आसपास चे तालुक्यात ही सहकार उद्योग उभा करण्यास सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका सहकार महर्षि कैशंकरराव नारायणराव मोहिते पाटील यांनी घेतली.
जिल्हा अर्थकारणातील महत्वाची मानली जाणारी जिल्हा मध्यवर्ती बँक , व त्याचे गाव पातळी पर्यंत पोहचलेले जाळे , भू विकास बँक इत्यादी संस्था वर विना भेदभाव व पक्षीय दृष्टिकोन विरहित भूमिका घेऊन , कै ब्रह्मदेव माने, कै. भाई एस एम पाटील, कै आ गणपतराव देशमुख , कै. भाई चंद्रकांत निंबाळकर , कै. बाबुराव अनगरकर पाटील , वै. श्रीमंत सुधाकर पंत परिचारक, अशी अनेक मला ज्ञात व अज्ञात असलेली मंडळी पक्षभेद बाजूला ठेऊन आपापल्या विभागाचा विकास करण्यासाठी एक मुखी प्रयत्न करत होते.
तत्कालीन काळातील सर्वात मोठा पक्ष काँग्रेस होता. आणि वसंतदादा गटाचे नेतृत्व कै. सहकार महर्षि यांच्या कडे होते .
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे खजिनदार पद मोहिते पाटील यांच्या कडे होते , पण सगळ्यांना सामावून घेत मोठी एकसंघ फळी ग्रामीण भागात अस्तित्वात होती.त्या काळी ही करमाळा विभागात कै. नामदेवराव जगताप यांचा गट अस्तित्वात होता. परंतु व्यक्तिगत पातळीवर तिरस्कार करण्याची रीत कोठेच अस्तित्वात नव्हती .
म्हणूनच आदिनाथ सारखे सहकारी साखर कारखाने निघू शकले.माढा विभागात कै विठ्ठलराव शिंदे , साठे , झाडबुके , सोलापूर येथील आ. ठोकळ असे अनेक नेते पक्षाचे काम करीत .
राजकारणातील दुसरी पिढी सक्रिय झाली.मोहिते पाटील यांच्या दुसऱ्या पिढीने राजकारणात पाऊल ठेवले.
1977साली काँग्रेस पक्षाचे विरोधात एकसंघ होत सर्वपक्षीय जनता पक्ष स्थापित झाला , आणि त्या काळात काँग्रेस पक्षाकडून पंढरपूर लोकसभा राखीव साठी कै ऍड संदीपान थोरात निवडणुकीला उभे राहिले ,
माझे वडील दिवंगत तात्यासाहेब काले हे रीपाई खोब्रागडे गटाचे अधिकृत तर जनता पक्ष पुरस्कृत उमेदवार म्हणून उभे राहिले.
सहकार महर्षि काकासाहेब आणि माझ्या वडिलांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते पण दोघेही जन आपापल्या पक्षाप्रती प्रामाणिक होते.तरीही कै सहकार महर्षि किमान तटस्थ राहिले , आणि युवा नेते असलेल्या व सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष पद सांभाळणाऱ्या विजयसिंह मोहिते पाटील यांना पक्षीय निष्ठा म्हणून काम पार पाडावे लागले.
राजकारणातील दुसऱ्या पिढीतील कै. आ. दिगंबर बागल, आ. बबनदादा शिंदे , आ. दिलीप सोपल अशी सर्व मंडळी शिवरत्न व प्रतापगडा सी संबंधित होती या मुळे विकासाची ही गंगा सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शांतपणे वाहत होती. कुठे ही त्या मध्ये खंड पडत नव्हता.
पण काळ बदलला आणि हा सामूहिक समंजसपणा लुप्त झाला.
राजकारणात , व समाज जीवनात वेगवेगळ्या पक्षीय विचारधारा अस्तित्वात आल्या आणि यातून अनेक नव्या नेतृत्वाचा उदय अस्तित्वात आला.
ही नव नेतृत्व सहकार चळवळी बाहेरची होती.त्यांचे स्वतःचे नव निर्माण नव्हते.ते प्रचलित व्यवस्थेवर आघात करत होते.व्यवस्थेतील त्रुटी शोधून त्यावर टोच्या मारणारे कावळे आणि त्यांचे थवे निर्माण झाले.ही काक वृती त्यांनी सहकार चळवळीतील तिसऱ्या पिढीत पेरण्याचे काम केले.
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात नेतृत्वाला आदर देण्याची परंपरा जाऊन अरे तुरे करणारे नेतृत्व पुढे आले.स्वतः भोवती राजकीय शक्ती केंद्रित करण्याच्या भूमिकेतून त्यांनी या फुटीला खतपाणी घातले.
“सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचे शक्ती स्थान आणि केंद्र बिंदू बदलवून खरोखर विकास साध्य झाला असता तर त्याचेही स्वागत आमच्या सारख्यानी केले असते”.
पण साधे रस्ते , शेतातील वीज आणि डी पी सारख्या समस्या ही निर्माण झाल्या , जी सुबत्ता आणि शांतता ग्रामीण भागात होती ती आत्ता कुठे लुप्त झाली?
मला इथे या भागातील कोणत्याच पूर्वाश्रमीच्या खानदानी सुसंस्कृत राजकीय घराण्यावर टीका करायची नाही , पण तुमच्या तील अंतर्गत संघर्षाला कोण खतपाणी घालतो?
तुमचे म्हणून तुमच्यात शिरकाव करू पाहणाऱ्या नव नेतृत्वाचे सहकारी चळवळीत, त्याचे उभारणीत योगदान किती?
आपण निर्माण केलेल्या सुबत्तेवर ज्या नव नेतृत्वाच्या घुशी निर्माण झाल्या आहेत , आणि त्या धष्टपुष्ट होऊन सार्वत्रिक धुमाकूळ घालत आहेत तो खरोखर सर्वा साठी लाभदायक आहे काय?
याचे आत्मचिंतन सर्वांनी करणे गरजेचे झाले आहे.
राजकारणात स्पर्धा जरूर असावी पण ती सुसंस्कृत आणि खानदानी असावी.टीका करतानाही त्यात वैचारिकता असावी ,
आ.शहाजी बापू आणि त्यांचे सहकारी यांचा दर्जा पहा. त्यांची भाषा पहा. सोलापूर जिल्ह्याच्या सहकाराच्या नंदनवनात या घुशी आणि गिधाडांचे साम्राज्य निर्माण करून काहीही साध्य होणार नाही.
तुम्हारा लहजा बता रहा है , तूम्हारी दौलत नई नई है,,,,
जरासा कुदरतने क्या नवाजा ,,,,,
के आके बैठे हो पहली सक मे ,,,,,
पहिल्या रांगेत आपण कुणाला बसवत आहोत हेही तपासा “गिधाडांच्या चोचीतील मटणाच्या तुकड्या कडे आशाळभूत पने पाहणाऱ्या उंदराच्या चाळ्या कडे दुर्लक्ष कराल तर सहकार मंदिराच्या समयीतील तेलाची जळती वात तोंडात ठेऊन ते आगी लावतील.
लगेगी आग मकानो मे,,, तो जद मे कई मकान होंगे ,,,
सिर्फ हमारा मकान थोडी है,,,,

ऍड अविनाश टी. काले अकलूज
मो.न :-9960178213

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button