ताज्या घडामोडी

मरुस्थल आणि मृगजळ

मरुस्थल आणि मृगजळ

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 16/02/2024 :
विस्तीर्ण अश्या वाळवंटी भागात कुठे तरी एक सुंदर असा पाण्याचा छोटासा नैसर्गिक तलाव असतो , त्याच्या सभोवती थोडेशी त्याला साजेशी हिरवळ असते , आजूबाजूला खजुराची उंच झाडे असतात ,
अनेक वाटसरु आणि काफिले तेथे च विश्रांती घेतात , वाळवंटात दिवसा प्रवास करणे अवघड असते , सूर्य आग ओकत असतो आणि वालुकामय वादळे घोंघावत पुढे सरकत असतात.सातत्याने वाळूचे ढिगारे नव्याने निर्माण होतात.जुने ढिगारे नष्ट होतात.त्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही. रात्री वाळवंट शांत असतात. हवामानात कमालीचा थंडावा असतो पण आकाश निरभ्र असते.आकाशात चांदण्या ठळकपणे त्यांचे अस्तित्व दाखवत असतात.
या चांदण्या म्हणजे अनामिक ग्रह असतात जे त्यांची जागा कधीच बदलत नाहीत. त्यांना तारे म्हणून ही ओळखले जाते.अंधारात तेच दिशा दर्शवतात , आणि काफिला त्या दिशेच्या मार्गाने रवाना होतो. आणि सुखरूप आपापल्या निहित स्थानी पोहचतो.
हा झाला सुखद प्रवासाचा भाग , पण हे सुख प्रत्येकाच्या नशिबी नसते “अब्दुल्ला” नावाचा हिंदी चित्रपट ज्यांनी पाहिला असेल त्यांना हे समजून जाईल की अश्या वाळवंटी प्रदेशात ही डाकुंच्या टोळ्या सक्रिय असतात.या अश्या मरुस्थलावर त्यांची नजर भिरभिरत असते. शांत आणि विकसित प्रदेशावर ते सतत घिरट्या घालून त्यांना लुबाडून जगण्यावर त्यांचा भर असतो
आपली कथा अश्या टोळी वर आधारित नाही. तर अशा मरुस्थलाच्या शोधात जीवन जगण्यासाठी आलेल्या विविध भागातील आमच्या सारख्या चे जीवनावर आधारित आहे.
या मरुस्थलाने आम्हाला काय काय दिले. जीवन जगण्याचे बळ दिले , सन्मान दिला , आणि आम्ही प्रगती ची उंच उड्डाणे घेऊ शकू हे बळ आमच्या पंखांना दिले.
इथल्या विकास रुपी खजुराचे गोड खजूर खाऊन आमची भूक तृप्त झाली.याच मरुस्थला ने आमच्या निवाऱ्याची सोय केली.
ज्यांनी हे खजुराचे झाड लावले त्यांच्या प्रति आम्ही कृतज्ञ रहावे. ज्यांच्या मालकीच्या खजूर बागेतून त्यांनी आमच्या साठी थोडीशी का होईना खजूर काढून दिली त्यांच्या प्रति थोडी तरी कृतज्ञता बाळगून त्यांना धन्यवाद द्यावेत. त्यांचे साठी त्यांचे थोडेसे काम करून उतराई होण्याची संधी मिळाली तर ते आपले ईश्वरीय कर्तव्य समजून ते कार्य पार पाडावे. ही सामान्यातील सामान्य माणसाची भावना असते.
फक्त त्या साठी तो अंतर्बाह्य माणूस असावा लागतो.माणसात हव्यास असला की माणसाचा राक्षस बनतो. त्याची विवेक बुध्दी लोप पावते , आणि याच हव्यासातून तो याच मरुस्थलाच्या मुळावर घाव घालण्यासाठी सज्ज होतो.
मरुस्थला चे शत्रू त्याला मित्र वाटू लागतात. आणि अश्या शत्रूच्या विजयाची कामना ही तो करू लागतो.
तोच त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग वाटतो. आपल्याच माणसांच्या विरोधात उभे राहणे त्याला बंडखोरी वाटत असते.
हा दृष्टिकोनातील फरक आहे.
लाखो लोक जिथे शांतता, सुख आणि समृद्धी ची फळे चाखत असतात , ती सर्व लाचारी आहे अस त्याला वाटू लागत. त्याची दिवसा उजेडी लख्ख सूर्य प्रकाशात क्षितिजा कडे नजर जाते.
वाळवंटाच्या तप्त वाळूतून उष्ण हवेचे झोत आकाशाच्या दिशेने वर झेपावत असतात आणि हवेच्या झोताने ते हलत असताना जणू पाण्याच्या लाटा हलत आहेत असा त्याला भास होतो
छोट्याश्या तलावाने त्याची तहान भागवली याचा विसर त्याला पडतो ,
समोर विस्तीर्ण असा जलाशय दिसत असताना हे मूर्ख लोक इथेच का बसले आहेत? असे म्हणून तो तूच्छ
तेची एक नजर टाकून त्या मृगजलाच्या दिशेने चालायला सुरुवात करतो.आमच्या सारखे अनुभवी लोक ओरडुन सांगतात आम्ही अनुभव घेतला आहे त्या कठीण विषाचा ,,, तुमच्या वाट्याला तो विषाचा प्याला येऊ नये असे आम्हाला वाटते , म्हणून माझ्या तरुण मित्रा माघारी फिर , तुला जे धाडस वाटत आहे ते धाडस नाही तर तो आततायी पण आहे , ज्यात ना तुझे भले आहे , ना तुझ्या सुखद भविष्याची खात्री आहे.
पण तो संमोहित झालेला असतो. गोड फसव्या शब्दांच्या मोहजालात पुरता अडकलेला असतो. तो चालत राहील , ते मायावी लोक कांहीं काळ त्याच्या वर कृपेची छाया पांघरतील , पण निवडणुकीचा काळ ओसरला की ते कृपा छत्र ही ते काढून घेतील ,,
जमले तर त्याचा जितका वापर करता येईल तितका ते करून घेतील , ते त्याला कायमस्वरूपी आश्वस्त करू शकत नाहीत.
हे त्याचं प्राक्तन आहे. आपण त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्यावे. आपले लक्ष अशी छोटी प्यादी थोडीच आहेत ?
बुध्दी बळाच्या खेळात रॉबिन राऊंड नावाचा एक खेळ आहे.अज्ञात सहा शत्रूच्या खेळावर मात करण्याचा तो प्रकार आहे.
इथे तर आपल्या साठी कोणीच अज्ञात नाहीत.आपल्या शत्रुची अंडी पिल्ली आपण जाणतो.
सोलापूर लोकसभा मतदार संघ आपल्या साठी नवखा होता. पण आपण तो पिंजून काढला. आणि प्रचंड बहुमताने आपण तो गड जिंकला. ही आपल्या मोहिते पाटील समर्थकांची ताकद आहे. आपल्या एकसंघ भावनेला , आपल्या समर्पित वृत्तीला हरवू शकेल अशी कोणतीही शक्ती अस्तित्वात नाही.
आपल्यातील प्रत्येक कार्यकर्ता मदारी मेहतर आहे.जो जीवाची बाजी लाऊ शकतो त्याला विकत घेणारी शक्ती अजून पैदा झाली नाही.
दगडाची मूर्ती बनवण्या पूर्वी त्या दगडाला ही ठोकून घ्यावे लागते याचे कारण कमजोर पापुद्रे अगोदर निघून गेले पाहिजेत , असे पापुद्रे गळून गेले याचे वाईट वाटण्याचे कारण नाही. लढाईच्या प्रसंगातच आपली माणसे आणि शत्रू पक्षातील माणसे ओळखू येतात.
जो तो ज्या त्या गोटात स्थिरावू द्या. पक्षाने तिकीट जाहीर केल्या नंतर ही अजून अनेकांचे चेहरे उघडे पडणार आहेत आणि निष्ठेचा ही कस लागणार आहे.
म्हणून शांतपणे आपापल्या कामाला लागा.ही निवडणूक आपल्याला आपला माणूस धैर्यशिल मोहिते पाटील यांना संसदेत आपला खासदार म्हणून पाठवायचा आहे. हे आपल ठरलंय 100% ,,, मग त्याच ध्येयाचा पाठलाग कचरू .आपली नाहक ऊर्जा मृगजळाच्या मागे धावणाऱ्या माणसाच्या मागे त्याला वादविवाद करण्यात घालवू नका ,,,

ऍड अविनाश टी. काले.
अकलूज
मो.न :-9960178213

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button