बारा बलुतेदार अठरापगड मागासवर्गीय जाती जमातीच्या समाजाचा 20 ऑगस्ट रोजी मेळावा

बारा बलुतेदार अठरापगड मागासवर्गीय जाती जमातीच्या समाजाचा 20 ऑगस्ट रोजी मेळावा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
धुळे /जिल्हा प्रतिनिधी
दिनांक 19 ऑगस्ट 2024 :
डॉ.. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले 26 जानेवारी 1949 रोजी स्वतंत्र भारताचे संविधान लोकशाही मार्गाने देशाचे सुत्रे चालविण्यासाठी लागु झाले. त्यात मानवाचे मुलभूत अधिकार स्वातंत्र्य, समता व बंधुताचे समान अधिकार दिले. मात्र समाजात धनदांडगे प्रस्थापितांनी सर्वसामान्य अज्ञानी समाजाचा गैरफायदा घेऊन फळे चाखली व आजही सर्व सुत्रे त्यांच्याच ठरावीक लोकांच्या हातात आहे. कळसुत्रीच्या बाहुलीप्रमाणे सर्वसामान्य जनतेला नाचवण्याचे अहोरात्र कार्य सुरु आहे. घटनादत्त अधिकारांची पायमल्ली होत आहे. आज सर्व समाज साक्षर व बुध्दीने सज्ञान झाला आहे. सामाजिक, राजकिय व शैक्षणिकदृष्ट्या जो हक्क समाजाला मिळायला हवा तो प्राप्त होत नाही, न्यायहक्काची पायमल्ली केली जाते व “पिछेसे आयी आगे धकाई” असे नियोजनबध्द कार्य सुरु आहे. जाती जातीत तेढ निर्माण करुन अशांतता निर्माण करण्याचा पडद्याआड राहून प्रयत्न सुरु आहे. अल्पसंख्य असणारा समाज त्यांच्या मतावर निवडून येऊन त्यांनाच वैधानिक घटनादत्त अधिकारापासुन वंचित ठेवण्याचा सोईस्कर प्रयत्न सुरु आहे. राजकिय क्षेत्रात तर प्रस्थापितांचीच मक्तेदारी आहे. आता समाज जागृत झाला आहे. त्याला त्याच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र येऊन आपला अधिकार मागुन मिळत नसेल तर वैधानिक मार्गाने प्राप्त करुन घेण्याचा नैतिक अधिकार आहे. म्हणून धुळे तालुक्यातील बारा बलुतेदार हटकर, धनगर, माळी, साळी, जैन, कोळी, धोबी, बौध्द, चांभार, वाणी, ब्राम्हण, वंजारी, भोई, राजपूत, तेली, कासार, गुरव, शिंपी, सोनार, गोसावी, लोण्यापाटील, बेलदार, जाट, बडगुजर, गोपाळ, नंदिवाले, आदिवासी, कुंभार, न्हावी, मांग, लोहार, सुतार, भराडी, गारुडी, कैकाडी, इ. समाज जागृत करुन मंगळवार दि. 20/08/2024 रोजी इच्छापुर्ती गणपती मंदिर, सांजोरी फाटा, साक्री रोड, धुळे येथे आयोजित केलेला आहे. आपआपल्या समाजाचे नेतृत्व करणाऱ्या समाज धुरीनांनी हस्ते पर हस्ते कळवून मेळाव्यास येण्याचे आव्हान करावे व आपल्या समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व राजकिय क्षेत्रातला आपला वाटा मिळण्यासाठी एकत्रीत येण्याचे आव्हान अनिलशेठ कांकरीया वणी, अभिलाल दादा देवरे सुट्रेपाडा, शांताराम दुकळे आर्वी, अरुण मासुळे गोताणे, विलास गर्दे आर्वी, खुमानसिंग राजपूत, दंगल बापू धनगर, शिवनाथ कासार, डॉ. युवराज नवटे, विनोद बागले, दिपक शिरोडे, भगवान महाजन, ज्ञानेश्वनर हातगिर, भुरसिंग राजपुत, मधुकर सोनार, जगन जाधव, दिपक शिरोळे, सुरेश अहिरे, संजय महाराज राजपुत, शाम महाराज गोपाळ, भटू चौधरी, लखन ठेलारी, संतोष देवरे, दादाभाई वाघ, आर.के. माळी, अजय माळी, चंद्रकांत भदाणे, दिनेश वाघ, ज्ञानेश्वनर आप्पा चौधरी, डॉ. मनुकुमार पटेल, गोविंदा ठेलारी, श्री. भिमराव करनर, डॉ. अजय देवरे, विठ्ठल सुर्यवंशी, रविंद्र धनगर, विनोद पारधी, डोंगर आप्पा कोळी, निलेश कोळी, शामराव गोपाळ, सुनिल आव्हाड, कोमल गवळी, पंडीत गवळी, अशोक माळी, संग्राम चव्हाण, नवल पवार, आबासाहेब कांबळे, दिनेश गिरासे, उत्तम वायसे, दिपक शिंदे, भैय्या शिंदे वडार, लाला आमदार, मोतिलाल भिल, दिपक नाईक, दगडु शिंपी, संतोष देवरे, पुंडलिक सुर्यवंशी, सतिष टेलर इत्यादींनी केले आहे.