ओंकार साखर कारखाना चांदापुरी ऊसास 3000 रूपये दर देणार, पहिला हप्ता 2800/- रूपये : बाबुराव बोञे पाटील

ओंकार साखर कारखाना चांदापुरी ऊसास 3000 रूपये दर देणार, पहिला हप्ता 2800/- रूपये : बाबुराव बोञे पाटील
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
निमगाव प्रतिनिधी दिनांक 16/12/2024 :
ओंकार साखर कारखाना चांदापुरी युनिट एक 2024 व 2025 या सिझन मध्ये येणाऱ्या ऊसास पहिला हप्ता एक रक्कमी 2800/- रुपये प्रतिटन देणार असुन उर्वरीत बैल पोळ्यासाठी रु.100/- व दिपावली सणासाठी रु.100 /- देणार असुन फेब्रुवारी मध्ये येणाऱ्या ऊसास प्रति टन १00रूपये अनुदान देणार असुन तसेच दिपावली निमित्त ऊसासाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना मोफत साखर देणार असल्याची माहिती ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांनी दिली.
ओंकार साखर कारखाना चांदापुरी, (ता माळशिरस)चे चेअरमन बाबुराव बोञे पाटील, संचालिका रेखाताई बोञे पाटील, संचालक प्रशांत बोञे पाटील यांच्या मार्गदर्शकनाखाली कारखान्याने ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसास समाधानकारक दर दिला दिला असुन कारखान्याने प्रतिदिन गाळप क्षमतेत वाढ केली असुन उप पदार्थ प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत. शेतकऱ्यांनी आपला ऊस ओंकार साखर कारखान्याला घालावा असे अवाहन बोञे पाटील यांनी केले. या वेळी जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे, केन मॅनेजर शरद देवकर उपस्थित होते
“आपली कोणाशीच ऊस दरा बाबत स्पर्धा नसुन जे जे शेतकऱ्यांना व कर्मचारीवर्गांना वाहतुकदारांना देणे शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न ओंकार परिवाराचा राहिल”- बाबुराव बोञे पाटील