“बाह्य अंगाने प्रपंच मोठा करा पण आत मध्ये परमार्थ ठासून भरा”- ह. भ. प. शामसुंदर महाराज ढवळे

“बाह्य अंगाने प्रपंच मोठा करा पण आत मध्ये परमार्थ ठासून भरा”- ह. भ. प. शामसुंदर महाराज ढवळे
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
(श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे येथून भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे)
सोमेश्वर करंजे दिनांक 9 डिसेंबर 2024 : “जीवनतत्व व अध्यात्मतत्व एकत्र होणे, एकच रूप होणे म्हणजेच हरिनामाचा खिचडी काला. बाह्य अंगाने प्रपंच मोठा करा पण आत मध्ये परमार्थ ठासून भरा” असे मौलिक विचारांचे बौद्धिक ह. भ. प. शामसुंदर महाराज ढवळे यांनी अध्यात्मातील जीव शिवाचा काला यावर विवेचन करताना केले. श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे तालुका बारामती जिल्हा पुणे येथे सुरू असलेल्या पारायण व अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याचे किर्तन करताना सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी किर्तन व्यासपीठावरून ते बोलत होते.यावेळी दही आणि भाताचे उदाहरण देत राम अवताराचं आचरण करा व कृष्ण अवताराचा उच्चार करा असेही विचार त्यांनी विविध उदाहरणांच्या सहाय्याने भक्त, भाविक स्रोत्यांना पटवून दिले.
(ख्यातनाम कीर्तनकार भ प शामसुंदर महाराज ढवळे आणि श्री सोमेश्वर देवस्थानचे मुख्य पुजारी मोहन मुरलीधर भांडवलकर – छायाचित्र :अकलूज वैभव न्यूज नेटवर्क )
अध्यात्म आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ यांच्या एकरूपतेचा आनंद
(ख्यातनाम कीर्तनकार भ प शामसुंदर महाराज ढवळे आणि सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे)
पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे हे पहिले वर्ष नसून शताब्दी वर्षपूर्ती सोहळा असल्याप्रमाणे या सप्ताहाचे नियोजन संयोजकांनी केल्याचे कौतुकाची थाप ह भ प श्यामसुंदर महाराज ढवळे यांनी आपले कीर्तन सांगताना संयोजकांच्या पाठीवर दिली. त्याचबरोबर पहिल्या वर्षातील काल्याच्या कीर्तनाचा पहिला मान मला मिळाल्याचा विसर मला कधीही पडणार नाही असे सांगताना त्यांनी मोहन मुरलीधर भांडवलकर यांचा विशेषत्वाने नामोल्लेख केला.